Suzlon Energy Share : शेअर बाजारातील गुंतवणूक खूप जोखमीची असते. त्यामुळे जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवणार असाल तर त्यापूर्वी बाजाराचा अभ्यास करणे गरजेचे आहे. जर तुम्ही अभ्यास न करता पैसे गुंतवले तर पैसे बुडण्याची दाट शक्यता असते.
बाजारात असे काही शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना कमी वेळेत जास्त परतावा देतात. गुंतवणूकदार देखील या शेअर्सना पहिली पसंत देतात. बाजारात एक असाच शेअर आहे जो आपल्या गुंतवणूकदारांना जास्त परतावा देत आहे, त्याचे नाव सुझलॉन एनर्जी शेअर्स असे आहे.
जाणून घ्या ब्रोकरेजचे मत
सुमीत बगाडिया, कार्यकारी संचालक, चॉईस ब्रोकिंग ग्रीन एनर्जी समभागांवर तेजीत असून ब्रोकरेजला अल्पावधीत शेअर ६० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुमीत बगाडिया म्हणाले की, “सुझलॉनच्या शेअरची किंमत चार्ट पॅटर्नवर सकारात्मक असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यांच्या स्टॉक पोर्टफोलिओमध्ये सुझलॉनचे शेअर्स आहेत त्यांना 45 रुपयांच्या पातळीवर स्टॉप लॉस राखून एनर्जी शेअर्स ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो. “सुझलॉनचे शेअर्स अल्पावधीत 55 ते 60 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असे त्यांचे मत आहे.”
किमतीत होतेय झपाट्याने वाढ
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुझलॉन एनर्जीचे शेअर्स एका वर्षात 445.03% ने वाढले आहेत. या काळात त्याची किंमत 8 रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढली आहे. तर त्याच वेळी, सुझलॉन एनर्जीचे शेअर्स मागील पाच वर्षांत 780% पेक्षा जास्त वाढले आहेत. त्याची 52 आठवड्यांची उच्च किंमत 50.72 रुपये इतकी आहे. 52 आठवड्यांची कमी किंमत 6.96 रुपये इतकी आहे. त्याचे मार्केट कॅप 63,572.88 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
डिसेंबर तिमाहीत झाला बंपर नफा
चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) सुझलॉन एनर्जीचा नफा एकूण 160 टक्क्यांनी वाढून 203.04 कोटी रुपये इतका होता. मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या याच तिमाहीत कंपनीचा नफा ७८.२८ कोटी रुपये इतका होता. अलीकडेच सुझलॉन एनर्जीने शेअर बाजाराला माहिती दिली आहे की तिसऱ्या तिमाहीत त्यांचे एकूण उत्पन्न वाढून रु. 1,569.71 कोटी इतके झाले आहे. 2022 च्या याच कालावधीत ते 1,464.15 कोटी रुपये होते.