SUVs on budget । भारतीय बाजारात अनेक शानदार फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच होतात. यातील काही कार्सच्या किमती काही ग्राहकांच्या बजेटबाहेर असतात. पण अशाही काही कार्स आहेत ज्या तुम्हाला बजेटमध्ये खरेदी करता येतील.
तुमचे बजेट 15 लाख रुपयांपर्यंत असेल आणि तुम्ही एक शक्तिशाली SUV खरेदी करण्याचा विचार करत असल्यास काही मॉडेल्स असे आहेत जे खराब रस्त्यावर तसेच ऑफ रोडवरही चांगले प्रदर्शन करतात. महत्त्वाचे म्हणजे यापैकी एका एसयूव्हीची विक्री अव्वल आहे.
ह्युंदाई क्रेटा
Hyundai Creta ही भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी SUV आहे. किमतीचा विचार केला तर Hyundai Creta ची किंमत 10.99 लाख ते 20.15 लाख रुपये आहे. यात 1.5L MPi पेट्रोल इंजिन, 1.5L U2 CRDi डिझेल आणि 1.5L Turbo GDi पेट्रोल इंजिनचे पर्याय मिळतील. त्याची लांबी 4300 मिमी, रुंदी 1790 मिमी, उंची 1635 मिमी आणि व्हीलबेस 2610 मिमी असेल. तर Creta चे इंटीरियर प्रीमियम तसेच फीचर लोड केले आहे.
मारुती जिमनी
मारुती सुझुकी जिमनी खरेदी करण्यासाठी ही सर्वोत्तम पर्याय असून कंपनी या कारवर खूप चांगली सूट देत आहे. तुम्ही शक्तिशाली इंजिन आणि 4WD (4 व्हील ड्राइव्ह) असलेली कॉम्पॅक्ट SUV शोधत असल्यास मारुती जिमनी तुमच्यासाठी आहे. तसेच जिमनीमध्ये 1.5 लीटर के सीरीज पेट्रोल इंजिन आहे जे 104.8 PS पॉवर आणि 134.2Nm टॉर्क जनरेट करते.
हे निष्क्रिय स्टार्ट/स्टॉप बटण फीचरसह सुसज्ज असून यात ही एसयूव्ही 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 4 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायामध्ये खरेदी करता येईल. हे एका लिटरमध्ये 16.94kmpl पर्यंत मायलेज देईल. जिमनीची लांबी 3985mm, रुंदी 1645mm, उंची 1720mm आणि व्हीलबेस 2590mm आहे, तर ग्राउंड क्लीयरन्स 210mm असून किमतीचा विचार केला तर मारुती जिमनीची एक्स-शो रूम किंमत 12.74 लाख ते 14.79 लाख रुपये इतकी आहे.
महिंद्रा थार
महिंद्राची थार ही एक अतिशय लोकप्रिय एसयूव्ही असून ती 3 दरवाजे असलेली आहे. ही 1.5 लिटर डिझेल, 2.2 लिटर डिझेल आणि 2.0 लिटर पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची सुविधा मिळेल. थार 3-डोर 4×4 आणि 4×2 प्रकारांमध्ये उपलब्ध असून किमतीचा विचार केला तर थारची किंमत 11.35 लाख ते 17.60 लाख रुपये आहे.