SUV under 8 lakhs : 8 लाखांपेक्षा स्वस्तात खरेदी करा ‘या’ SUV, जबरदस्त मायलेजसह मिळेल उत्तम फीचर्स

SUV under 8 lakhs : जर तुम्ही नवीन SUV खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता 8 लाखांपेक्षा स्वस्तात लोकप्रिय कंपन्यांच्या SUV खरेदी करू शकता. ज्यात जबरदस्त मायलेजसह उत्तम फीचर्स मिळतील.

Hyundai Exter

किमतीचा विचार केला तर Hyundai Exter ही कार रोडवर 7.51 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत ऑफर केली जात आहे. तर त्याचे टॉप मॉडेल 12.90 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या शानदार कारमध्ये शक्तिशाली 1.2-लिटर इंजिन देण्यात आले आहे, जे उच्च गतीसाठी 82 bhp पॉवर आणि 114 Nm टॉर्क जनरेट करते. Hyundai Exter ला हाय पिकअप साठी 5-स्पीड गिअरबॉक्स मिळत असून कंपनीची ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये येते. मॅन्युअलपेक्षा ऑटोमॅटिक ऑपरेट करणे सोपे आहे.

निसान मॅग्नाइट

किमतीचा विचार केला तर ही कार रोडवर 7.23 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येत आहे. या कारचे टॉप मॉडेल ऑन-रोड 13.74 लाख रुपये इतके आहे. तर या कारमध्ये 999 cc पेट्रोल इंजिन आहे, जे उच्च पिकअपसाठी 72 पीएस पॉवर आणि 96nm टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स असून ज्यामुळे ती रस्त्यावर असताना 19.7 kmpl पर्यंत कमाल मायलेज जनरेट करते. हे लक्षात घ्या की कंपनी या कारचे सात प्रकार देत आहे.

Renault Kiger

किमतीचा विचार केला तर या कारचे बेस मॉडेल 7.27 लाख रुपयांच्या ऑन रोड किमतीत उपलब्ध आहे. तर त्याच वेळी, या कारचे टॉप मॉडेल 13.98 लाख रुपयांना दिले जात आहे. NCAP क्रॅश चाचणीमध्ये कारला 4 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. यात 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे पॉवरफुल इंजिन कारला जास्तीत जास्त 19 kmpl पर्यंत मायलेज मिळवण्यास मदत करते, असा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment