SUV Car । स्टायलिश लूक आणि जबरदस्त मायलेज, तुमच्या बजेटमध्ये खरेदी करा ‘ही’ कार

SUV Car । बाजारात SUV ची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जर तुम्ही SUV खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता 17 Kmpl मायलेज आणि मस्क्युलर लुक असणारी कार खरेदी करू शकता.

मिळेल जबरदस्त इंजिन आणि पॉवर

Kia Seltos ही हाय पॉवर कार असून तिचे 1482 cc, 1493 cc आणि 1497 cc असे तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. ही कार उच्च पिकअपसाठी 115 पीएस पॉवर आणि 144 एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीची ही शानदार कार 17 kmpl पर्यंत जास्त मायलेज देईल, असा कंपनीचा दावा आहे. किमतीचा विचार केला तर या मोठ्या आकाराच्या कारचे बेस मॉडेल 10.89 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. तर या कारची लांबी 4365 मिमी, रुंदी 1800 मिमी आणि उंची 1620 मिमी इतकी आहे.

मिळतील 11 रंग पर्याय

Kia Seltos मध्ये हाय स्पीडसाठी 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन मिळेल. ही कार 167 kmph चा टॉप स्पीड देत असून तरुणांसाठी या कारमध्ये 11 कलर ऑप्शन्स दिले आहेत. या कारमध्ये ऑटो क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. नवीन कारमध्ये ऑटो एसी आणि मागील सीटवर एसी व्हेंट्स मिळतील तर कारमध्ये अलॉय व्हील्स आणि स्टायलिश फ्रंट ग्रिल आहेत.

NCAP क्रॅश चाचणीमध्ये कारला 3 स्टार रेटिंग मिळाले असून या शानदार कारमध्ये सुरक्षिततेसाठी 360 डिग्री कॅमेरा दिला आहे. यामुळे गाडी चालवणे सोपे होते. या कारमध्ये पार्किंग सेन्सर दिले आहेत, ही कार सहा एअरबॅगसह खरेदी करता येईल. या कारमध्ये हिल होल्ड कंट्रोल उपलब्ध आहे, यामुळे उतारावर कार नियंत्रित करण्यास मदत होते. कंपनीची ही कार प्रगत चालक सहाय्य प्रणालीसह येते. या प्रणालीमुळे रस्ते अपघातांना आळा बसतो.

Kia Seltos बाजारात Hyundai Creta, Toyota Urban Cruiser Hyrider, Tata Nexon आणि Skoda Kushaq ला टक्कर देते. Hyundai Creta बद्दल बोलायचे झाले तर, ही कार एक्स-शोरूम 10.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. ही एक हाय पॉवर कार असून ज्यात 1.5 लीटर इंजिन आहे, ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये येते. कंपनी यात टर्बो इंजिनही देते. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Comment