मुंबई : यंदाच्या 2022 च्या टी-20 विश्वचषकात भारतीय खेळाडू सूर्यकुमार यादव जोरात खेळत आहे. परिणामी केवळ भारतातच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये सूर्यकुमार यादव चर्चेचा विषय राहिला आहे. यंदा त्याने टी-20 मध्ये सर्वोत्तम फलंदाजी केली आहे. यामुळे तो टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला असून भारताचा ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होता त्यात सूर्यकुमारने फक्त 25 चेंडूत नाबाद 61 धावा कुटल्या होत्या. शेवटच्या षटकात त्याने ज्या प्रकारे धावा केल्या त्याबद्दल प्रत्येकाला आश्चर्य वाटत आहे. त्यामुळेच त्याचे खासगी जीवन सध्या सर्च केले जात आहे.
भारतासाठी चमत्कार करण्यापूर्वी सूर्यकुमारने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी शानदार फलंदाजी केली. सूर्यकुमारने देशांतर्गत क्रिकेटमध्येही मुंबईसाठी चांगली कामगिरी केली. मात्र, त्याला कधीही भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. कारण भारतात अनेक प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. मात्र, आयपीएलमध्ये मुंबईसाठी लागोपाठ धावा केल्यानंतर सूर्यकुमारने भारतीय संघात स्थान मिळवले. 2021 च्या T20 विश्वचषकात तो काही विशेष कार्य करू शकला नाही. पण त्याने नंतर जबरदस्त खेळ दाखवला. विशेषत: 2022 मध्ये त्याने चांगल्या धावा केल्या. विश्वचषकासाठी रवाना झाला तेव्हा त्याची पत्नी देविशा हिने त्याला कोट घालून तयार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता लोकांना त्याच्या पत्नीबद्दलही जाणून घ्यायचे आहे.
देविशा शेट्टी ही मूळची दक्षिण भारतीय असली तरी तिचा जन्म मुंबईतला आहे. देविशाने मुंबईच्या पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले असून याच महाविद्यालयात तिची भेट सूर्यकुमार यादव याच्याशी झाली. कॉलेजमध्ये दोघांची आधी मैत्री आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 2016 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. सूर्यकुमारच्या लग्नाला फक्त त्याचे जवळचे मित्र आणि काही नातेवाईक उपस्थित होते. एकदम छोटेखानी कार्यक्रमात लग्न उरकले. त्यावेळच्या खूप आठवणी आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, त्याबद्दल विशेष काहीही त्यांनी सांगितले नसल्याने अनेकांना याची उत्सुकता आहे.
देविशा ही डान्स टीचर असून तिला सामाजिक कार्यातही रस आहे आणि तिने असे काही सामाजिक संस्थांमध्ये काम केले आहे. ती अनेकदा तिचे व सूर्यकुमारसोबतचे फोटो शेअर करत असते, ज्यामध्ये दोघांचे दोघांचे प्रेम दिसून येते. देविशानेही तिच्या पाठीवर सूर्यकुमारचे नाव गोंदवले आहे. सध्या देविशाही तिच्या पतीसोबत ऑस्ट्रेलियात आहे. बहुतेक दौऱ्यांमध्ये ती सूर्यकुमारसोबत असते.
अर्र भारताला मोठाच झटका; Ind Vs Eng T20 WC Semi Final पूर्वीच वाढली सगळ्यांची धाकधूक