Supriya Sule । सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा, म्हणाल्या; “भ्रष्टाचाराने बरबटलेलं सरकार..”

Supriya Sule । राज्य सरकार आणि केंद्र सरकारला सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागतो. अशातच आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

“राज्य सरकार हे असंवेदनशील, जुमलेबाज सरकार आहे. भ्रष्टाचाराला रोज क्लिन चीट दिली जात आहे. रविंद्र वायकर यांचे कुटुंब कशातून गेलं हे माहिती आहे का? खोटे आरोप करायचे वापरायचे आणि फेकून द्यायचं. हे भाजपचे काम आहे. सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी यांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनं केली. पण त्यांनी कधी कॉम्प्रोमाईज केलं नाही,” सुळे यांनी स्पष्ट केले.

पुढे त्या म्हणाल्या की, “रक्ताचे नमुने बदलले जात असल्याचे प्रकार गृहखात्याकडून सुरु आहेत. दूध दराच्या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांचे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असून यावर लवकरात लवकर राज्य सरकारने तोडगा काढावा. हे असंवेदनशील सरकार आहे. लोकप्रतिनिधींना आंदोलन करावं लागतं आहे,” असा आरोप सुळे यांनी केला.

“ट्रिपल इंजिन सरकार काहीही करेल. जे सत्तेत आहेत ते ब्लॅकचे व्हाइट करण्याची एजन्सी झाली आहे. सरकारला पोलीस महिलेचे अश्रू दिसत नाही का? पुण्यात पेट्रोल अंगावर टाकण्याचा प्रकार घडला, वर्दीची भीती नाही का? हे भ्रष्टाचाराने बरबटलेलं सरकार आहे,” असा दावा सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला आहे.

Leave a Comment