Supriya Sule : आरक्षणाबाबत खासदार सुळे यांनी केली मोठी मागणी; पहा काय आहे त्यांचे नेमके म्हणणे

Supriya Sule : राज्याचे राजकारण दिवसेंदिवस वेगवेगळ्या कारणावरून पेटताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारला यामुळे सतत टीकेचा सामना करावा लागत आहे. याच मुद्द्यावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

सत्ताधाऱ्यांनी राज्याचे राजकारण अतिशय गलिच्छ केले आहे. घरे फोडा, पक्ष फोडा, पैसे वाटा, 50 खोके एकदम ओके. मराठी माणूस स्वाभिमानी असून 50 खोके नॉट ओके. त्यांनी 50 खोके वाल्यांना कधीच रिजेक्ट केले. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आमच्या घरापाशी येऊन म्हणाले होते, पहिल्या पंधरा दिवसात धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

पुढे त्या म्हणाल्या की, “आरक्षण हा विषय अतिशय संवेदनशीलपणे राज्य सरकारने बघितला पाहिजे. हे सरकार उपोषणाला दहा-पंधरा दिवसांपर्यंत का खेचते? मराठा असो, धनगर, लिंगायत, मुस्लिम कोणत्याही समाजाचा आरक्षणाचा विषय असू दे, त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. त्यांचे दहा वर्ष केंद्र सरकारमध्ये 300 खासदार असून बाकीच्या राज्यांची आरक्षणाची चर्चा होते, पण महाराष्ट्राची का होत नाही. जिथे जिथे आरक्षणाची मागणी आहे, ती सगळी बिल मागवा, अशी मोठी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यावर सरकार काय उत्तर देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पेपरफुटीप्रकरणी देखील सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. “एंटरन्स परीक्षेत होणारे घोळ, पेपरफुटीचे प्रकरण सतत सुरु आहे. तलाठ्याच्या परीक्षेपासून डॉक्टरांच्या परीक्षेपर्यंत हेच होत असून प्रशासन तोंडावर पडत आहे. या प्रकरणाची पारदर्शकपणे कसून चौकशी झाली पाहिजे,” अशी देखील सुप्रिया सुळे यांनी मागणी केली.

Leave a Comment