मुंबई : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळातील नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याचा धक्कादायक प्रकार एका मुलाखतीमध्ये घडला आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला असता सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंना कॅमेरासमोरच शिवी घातल्याचं दिसून आलं.

नेमकं काय म्हणाले होते सत्तार – :सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर करण्यात आली होती. त्यावर तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं. याबाबत औरंगाबादमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिंशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही खोके देऊ,” असे उत्तर सत्तार यांनी दिले.

सत्तार यांच्या याच भाषेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा राजीनामा घ्यावा. तसेच सत्तार यांनी आपले शब्द मागे घेत जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

must read

Share.

Leave A Reply

Exit mobile version