Supreme Court । कोणाला मिळणार पक्ष आणि चिन्ह? विधानसभेपूर्वी होणार सर्वात मोठा निर्णय

Supreme Court । राज्यात काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत राज्यात महायुतीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे आता महायुती जोमाने तयारीला लागली आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का बसला होता. त्यात पक्ष आणि चिन्ह देखील एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मिळालं. अशातच या दोन्ही गटाने वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या होत्या. पण निवडणुकीमध्ये सर्वात जास्त फायदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटाला झाल्याचा पाहायला मिळाला. आगामी विधानसभा निवडणुकीत चित्र काय असेल हे येत्या काळात समजेल. अशातच आता ॲड असीम सरोदे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

असीम सरोदे म्हणाले की, विधानसभा निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान होऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर दोन्हीही पक्षाच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी निकाल पुढच्या दोन ते तीन महिन्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ते पुढे म्हणाले की, “विधानसभा निवडणुकांच्या पूर्वीच पक्ष आणि चिन्ह कोणाचं? पक्षाचे मूळ बांधणी करणारे कोण? याचा निकाल लागेल. खरं कोण आणि खोटे कोण याचा सुद्धा निकाल सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षित आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणावरती जो निकाल देण्यात आला आहे, तो निकाल अत्यंत दुर्गामी परिणाम करणार असून त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असल्याने त्यांच्याकडे दिली होती. परंतु त्यांनी कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णया न देता, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अवहेलना करण्यात आली आहे. त्यांनी भारतीय संविधानासोबत फ्रॉड केलेला आहे,” असा आरोप असीम सरोदे यांनी केला आहे.

Leave a Comment