Superfood Seeds : जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचं असेल तर तुम्हाला फक्त व्यायाम करणे फायदेशीर नाही. व्यायाम करण्यासोबतच तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचं असेल तर तुम्हाला आहारात काही बियांचा समावेश करावा लागेल.
तीळ
तीळ हे शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी राखण्यासाठी फायदेशीर आहे. त्यात 103 कॅलरीज असून हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. तुम्ही हे खाल्ले तर शरीरातील साखरेचा समतोल राखला जातो. कॅल्शियम हाडांसाठी महत्वाचे आहे.
हे कर्करोग विरोधी मानले जाते. हे त्वचेसाठी देखील चांगले मानले जात असून त्यात भरपूर फायबर असल्यामुळे ते पचनासाठीही उपयुक्त आहे. यकृतासोबतच शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी ते फायदेशीर आहे.
सूर्यफूल बिया
सूर्यफूल बियांमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. इतकेच नाही तर त्यात निरोगी चरबी असते. जर तुम्हाला शरीरातील सूज कमी करायची असल्यास सूर्यफुलाच्या बिया जास्त चांगल्या आहेत. यापासून तयार होणारे तेलही मोठ्या प्रमाणात पोषक असते. हे प्रथिने, कॅल्शियम आणि अनेक जीवनसत्त्वे यांचा उत्कृष्ट स्रोत असून यात 155 कॅलरीज असतात. हे पॉलीसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचे उत्तम स्त्रोत असल्याने ते हृदयाशी संबंधित समस्या दूर करण्यास उपयुक्त आहेत.
चिया सीड्स
पाण्यात भिजवून खाण्याचे अनेक फायदे असून याचे तंतू इतर बियाण्यांसारखे कठोर नसतात. त्यांना रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. यात 138 कॅलरीज असतात. ते खाल्ले तर एन्झाइम्स आणि हार्मोन्स सक्रिय होतात. हे खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्याने ते खाल्ले तर पोट भरल्याची भावना येते. यात कॅल्शियमचे प्रमाणही चांगले असते, त्यामुळे हाडांसाठीही ते फायदेशीर असते.
भोपळ्याच्या बिया
हे लक्षात घ्या की भोपळ्याच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स कमी करतात. यात 163 कॅलरीज असून खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. एखाद्या व्यक्तीची मनःस्थिती स्थिर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते.
ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. याशिवाय भोपळ्याच्या बिया अंतर्गत सूज कमी करण्यास मदत करतात. नियमितपणे योग्य प्रमाणात खाल्ले तर साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.