Sunetra Pawar । राजकारणातील मोठी बातमी! लोकसभेनंतर पहिल्यांदाच शरद पवारांच्या मोदीबागेत सुनेत्रा पवार, नेमकं कारण काय?

Sunetra Pawar । । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यापासून राज्याचे राजकीय वातावरण पेटल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमनेसामने येत असतात.

महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असून कालच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्वर ओकवर गेले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड तास-दीडतास चर्चा झाली. त्यानंतर आज शरद पवार यांच्या मोदीबागेत खासदार सुनेत्रा पवार पोहचल्या आहेत.

तासभरापेक्षा अधिक वेळ सुनेत्रा पवार मोदी बागेत होत्या. विशेष म्हणजे त्यावेळी शरद पवार त्याच ठिकाणी होते. परंतु सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेत कोणाची भेट घेतली? त्यांच्यात काय चर्चा झाली? याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. पण राज्यातील राजकारणाची दिशा पुन्हा शरद पवार फिरवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे बारामतीतून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. नणंद-भावजय यांच्या या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीवेळी संपूर्ण पवार कुटुंबिय अजित पवार यांच्या विरोधात गेले होते. पण या लोकसभा निवडणूक निकालात सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली.

Leave a Comment