Summer Tips: देशात सध्या कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे यामुळे नागरिकांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आज असे अनेक लोक आहे ज्यांना उन्हाळ्यात घामामुळे अंगावर खाज येते . जर तुम्हाला देखील उन्हाळ्यात अंगावर खाज येत असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या वापर करून तुम्ही खाजच्या समस्या पासून सुटका मिळू शकतात.
खाज टाळण्यासाठी घरगुती उपाय
मुलतानी माती
खाजपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीचाही वापर करू शकता. यासाठी मुलतानी मातीमध्ये थोडेसे गुलाबजल मिसळून अंगावर लावा. ते सुकल्यावर हलक्या हाताने धुवावे.
बर्फ
अंगावर जळजळ झाल्यास, कापसाच्या कपड्यात बर्फाचा तुकडा गुंडाळा आणि अंगावर घासून घ्या. असे केल्याने जळजळ दूर होते.
खोबरेल तेल
उन्हाळ्यात खाज टाळण्यासाठी खोबरेल तेलात थोडा कापूर मिसळून संपूर्ण शरीरावर लावा. यामुळे खाजची जळजळ होणार नाही आणि आराम मिळेल.
काकडी
काकडी देखील खूप उपयुक्त आहे. अशा स्थितीत लिंबू आणि काकडीचे तुकडे करून ते एका ग्लास पाण्यात टाका आणि नंतर जिथे खाज आली असेल तिथे लावा.