Sukanya Samriddhi Yojana: जर तुम्ही देखील तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी पैसे जमा करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारने एक जबरदस्त योजना राबवत आहे. या योजनेचा फायदा घेत तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी मोठी गुंतवणूक करून चांगला परतावा प्राप्त करू शकतात.
केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून सुकन्या समृद्धी योजना राबवत आहे या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून बंपर परतावा प्राप्त करू शकतात. सध्या या योजनेत 8.2 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
सुकन्या समृद्धी योजना ही एक लहान बचत योजना आहे. या योजनेची खास गोष्ट म्हणजे या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला आयकर लाभ मिळतो.
या योजनेअंतर्गत, आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा लाभ उपलब्ध आहे. याशिवाय, मुलीला मूळ रक्कम देखील मिळते त्यावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.
या योजनेत, तुमच्या मुलीचे खाते उघडल्यानंतर तुम्हाला 15 वर्षांसाठी पैसे गुंतवावे लागतील. ही योजना खाते उघडल्यानंतर 21 वर्षांनी परिपक्व होते. या योजनेअंतर्गत मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर खाते बंद करून पैसे काढण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा गणनेबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलीचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी 70 लाख रुपये जमा करू शकता.
जर तुम्ही या योजनेत मासिक 12500 रुपये वाचवले आणि 15 वर्षांसाठी वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवले. जर तुम्ही सध्याचा व्याज दर 8.2 टक्के मोजला तर तुम्हाला 21 वर्षांनी मॅच्युरिटीच्या वेळी 70 लाख रुपये मिळतील.
या योजनेच्या व्याजदराबद्दल बोलायचे झाल्यास, ते प्रत्येक तिमाहीत सुधारित केले जाते. योजनेची खास गोष्ट म्हणजे या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बाजारातील जोखमीचा सामना करावा लागत नाही. या योजनेत गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतात.