Sukanya Samriddhi Yojana । सरकारच्या अनेक योजना आहेत. ज्यापैकी सुकन्या समृद्धी योजना होय. अनेकजण या योजनेचा लाभ घेत आहेत. खास मुलींसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर एक महत्त्वाची बातमी आहे.
जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचे लाभ घेत असाल असल्यास तुम्ही 31 मार्च 2024 पूर्वी सुकन्या खात्यात किमान शिल्लक जमा करावे लागतात. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे खाते बंद केले जाईल. खाते पुन्हा चालू करण्यासाठी दंड भरावा लागेल.
किमान शिल्लक
सुकन्या समृद्धी योजनेत एका आर्थिक वर्षात किमान शिल्लक जमा करावे लागतात. जर तुम्ही असे केले नाही तर खाते गोठवले जाते आणि तुम्हाला कर लाभाचा लाभ मिळणार नाही.
जर तुम्ही सुद्धा 2023-24 या आर्थिक वर्षात सुकन्या खात्यात काहीही जमा केले नसल्यास तुम्ही लवकरात लवकर खात्यात किमान रक्कम जमा करावी.
सुकन्या समृद्धी खात्यामध्ये तुम्हाला एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये जमा करावे लागतील. यात तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करू शकता. कमीत कमी शिल्लक जमा केली नाही तर खाते गोठवले जाईल आणि त्यानंतर खाते पुन्हा सुरू करण्यासाठी 50 रुपये दंड भरावा लागणार आहे.
या दंडासोबतच खाते सक्रिय करण्यासाठी तुम्हाला किमान रक्कमही भरावी लागणार आहे. दंड आणि किमान रक्कम जमा झाल्यावर खाते सक्रिय करण्यात येईल.
इतकेच नाही तर सरकारने नो युवर कस्टमर (KYC) अनिवार्य केले असून जर तुम्ही अजून KYC केले नसेल तर तुम्ही हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे.