Sujay Vikhe Criticized Nilesh Lanke : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे डॉक्टर सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात (Nilesh Lanke) लढत होत आहे. दोन्हीही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे दोन्हीही उमेदवारांमध्ये आता आरोप प्रत्यारोप जोरदारपणे होऊ लागले आहेत दहा वर्षे मुख्यमंत्री आणि पंधरा वर्षे केंद्रात मंत्री असतानाही नगर जिल्ह्यासाठी एकही काम ज्येष्ठ नेते करू शकले नाहीत आता त्यांनी दिलेला उमेदवार काय करणार असा रोकडा सवाल सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे माझ्याकडे सांगण्यासाठी विकास कामे आहेत परंतु समोर मात्र फक्त दहशत आहे असा तुलाही सुजय विखे यांनी लगावला.
पारनेर येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि बूथ प्रमुखांच्या संवाद कार्यक्रमात सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली यावेळी मतदारसंघातील भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sujay Vikhe : फाडफाड इंग्रजीचं चॅलेंज! लंके अन् रोहित पवारांचं विखेंना तिखट प्रत्युत्तर
Sujay Vikhe Criticized Nilesh Lanke
आपल्या भाषणात विखे पाटील म्हणाले की, देशात पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचे सरकार सत्तेत येणार आहे. परंतु, ज्यांनी फक्त राज्यात दहा उमेदवार उभे केले आहेत असे जेष्ठ नेते मोठमोठे स्वप्न पाहात आहेत. ज्यांच्या मतदार संघातील साठ टक्के निधी परत गेला अशा खासदारांना संसदरत्न पुरस्कार मिळतो हे आश्यर्चकारक अशी टीका त्यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता केली.
माझ्याकडे सांगण्यासाठी फक्त विकासकामे आहेत.इतरांसारखी गुंडगीरी आणि दहशत नाही. मागील पाच वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे आशिर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे आहेत. कुणी कितीही धमक्या दिल्या तरी या धमक्यांना घाबरत नाही. या तालुक्यातील जनताच या धमक्यांना आता उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिला.
Sujay Vikhe Criticized Nilesh Lanke
Nilesh Lanke : लंकेंना थोरातांची साथ; तिकीट मिळताच संगमनेरात घेतली भेट, चर्चा काय?
ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्याची आहे. परंतु केवळ विरोधासाठी काहीजण एकत्र आले आहेत. ज्यांचे नेतृत्व घेऊन समोरचे उमेदवार उभे आहेत त्यांनी जिल्ह्यासाठी काय केले? अनेक वर्षे राज्यात मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्रीपद भोगणाऱ्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेही योगदान दिलेले नाही. संरक्षण मंत्री असतानाही के. के. रेंजचा प्रश्न सोडविला नाही. जिल्ह्यातील माजी महसूल मंत्री यांनीही के.के. रेंजच्या जमीनींबाबत ठाम भूमिका कधी घेतली नाही, अशी टीका त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.