Sugar : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम आता आटोपले आहेत. जिल्ह्यात यंदा जास्त प्रमाणात ऊस होता त्यामुळे गाळप जास्त दिवस चालले आहे. यावेळी 23 साखर कारखान्यांनी (Sugar Factory) तब्बल 1 कोटी 85 लाख 44 हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले. याद्वारे जवळपास 1 कोटी 85 लाख 37 हजार क्विंटल साखर उत्पादन (Sugar Production in Ahmednagar District) घेण्यात आले. जिल्ह्यातील हे विक्रमी साखर उत्पादन आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अतिरिक्त उसाच्या संकटावर मात केली. अनेक ठिकाणी अतिरिक्त ऊस होता. पंधरा ते वीस दिवसांपूर्वी जिल्ह्यात 1 लाख 16 हजार मेट्रीक टन ऊस (Sugar Cane) शिल्लक होता. मात्र, याबाबत नियोजन केल्याने या सर्व उसाचे गाळप करणे शक्य झाले आहे. जिल्ह्यात उसाचे उत्पादन नेहमीपेक्षा जास्त झाल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे साखर कारखाने, शेतकर्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत हा ऊस गाळप होणे आवश्यक होते. यासाठी सरकारनेही पुढाकार घेत साखर कारखाने सर्व उसाचे गाळप पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
BJP- Shiv Sena: भाजप पुन्हा शिवसेनेसोबत युती करणार का?; अनेक चर्चांना उधाण https://t.co/vYegSmyin1
— Krushirang (@krushirang) June 30, 2022
गाळप व ऊस वाहतुकीसाठी अनुदान (Subsidy For Sugar Cane Transport) जाहीर केले होते. जिल्हा पातळीवरही बैठका होत होत्या. यामध्ये ऊस गाळप करण्याचे नियोजन केले जात होते. पालकमंत्र्यांनीही 30 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत 15 दिवसांत सर्व उसाचे गाळप करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावेळी जिल्ह्यात 1 लाख 16 हजार 500 मेट्रीक टन ऊस शिल्लक होता. आता मात्र, परिस्थिती बदलली आहे. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचे गाळप हंगाम आटोपले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उताराही सुधारला आहे. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक म्हणजे 11.67 टक्के राहिला आहे. त्यापाठोपाठ राहुरी कारखाना 11.33 टक्के, अशोक 11.16 टक्के, श्रीगोंदा 10.93 टक्के, वृद्धेश्वर 10.73 टक्के असा साखर उतारा राहिला आहे.
BSNL Recharge Plan : फक्त एकदाच रिचार्ज करा.. वर्षभर टेन्शन विसरा.. पहा, कोणता आहे ‘हा’ प्लान.. https://t.co/unJfbSM5hH
— Krushirang (@krushirang) June 30, 2022
विक्रमी 1 कोटी 85 लाख क्विंटल साखर उत्पादन
जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांनी एकूण 1 कोटी 85 लाख 37 हजार 268 क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात हे विक्रमी साखर उत्पादन असल्याचे सांगण्यात आले.
आता साखरही करणार कमाल..! 5 महिन्यात होणार ‘हे’ मोठे रेकॉर्ड; वाचा महत्वाची माहिती..