Student Elections : राजस्थानमधील (Rajasthan) विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित विद्यार्थी संघटना एनएसयूआयला (NSUI) जोरदार झटका बसला आहे. कॅम्पस निवडणुकीत (Campus Election) एनएसयूआयला पराभवचा मोठा धक्का बसला आहे. राज्यातील 14 विद्यापीठांपैकी 5 एबीव्हीपी (ABVP), दोन एसएफआय आणि 7 अपक्षांनी ताब्यात घेतले आहे. सीएम अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या बालेकिल्ल्यात एनएसयूआयला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
द्राक्ष म्हणजे अहा..हा.. भन्नाट आंबट-गोड अन् चवदार..
🍇🍇🍇🍇
द्राक्ष बागायतदार संघाच्या अधिवेशनात सहभागी होऊन वाढवा शेतीचा गोडवा..#द्राक्ष #grapes pic.twitter.com/nUCYFFJZtb— Krushirang (@krushirang) August 26, 2022
राजस्थानच्या 14 पैकी एकाही विद्यापीठात एनएसयूआयला विजय मिळवता आला नाही. परिस्थिती अशी आहे की राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा गृहजिल्हा जोधपूर, सचिन पायलट यांचा मतदारसंघ टोंक आणि पीसीपी प्रमुख गोविंद सिंग डोटासराचा गृहजिल्हा सीकर येथेही एनएसयूआयला पराभवाचा सामना करावा लागला. ज्या 14 विद्यापीठांमध्ये एनएसयूआयचा पराभव झाला आहे. तेथून गेहलोत सरकारचे 16 मंत्री येतात. त्यापैकी 14 दिग्गज हे त्या विद्यापीठ आणि महाविद्यालयांशी संबंधित आहेत.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे देखील JNVU चे माजी विद्यार्थी आहेत. त्याचवेळी गोविंद डोटासरा यांनी सीकरच्या एसके कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. तसेच महेश जोशी आणि प्रताप सिंग हे मंत्री राजस्थान विद्यापीठात अध्यक्ष राहिले आहेत. गेहलोत यांचे मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात एनएसयूआयला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सीएम गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांचा गृह जिल्हा असलेल्या जोधपूरमधील जैननारायण व्यास विद्यापीठ आणि एमबीएम विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांमध्ये एनएसयूआयला पराभवाचा सामना करावा लागला. जेएनव्हीयूमध्ये एकेकाळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शिक्षण घेतले होते. यामध्ये एसएफआयचे अरविंद सिंग भाटी आणि एमबीएममधून अपक्ष चंद्रांशु खेरिया विजयी झाले आहेत.
Congress : राजीनाम्यांमुळे काँग्रेस हैराण.. आज होणाऱ्या बैठकीत ‘या’ नेत्यांवर राहणार लक्ष
विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत तिकीट वाटपावरुन असंतोष रस्त्यावर येऊ शकतो. मंत्री मुरारी लाल मीणा यांनी नुकतेच एनएसयूआयच्या प्रदेशाध्यक्षांवर निशाणा साधला होता. मुरारी लाल म्हणाले की, एनएसयूआयने तिकीट वाटपात पारदर्शकता आणली नाही. या दारुण पराभवावरून एनएसयूआयमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होऊ शकतात, असे मानले जात आहे.