Student admission । सरकारचा विद्यार्थ्यांना पुन्हा मोठा दिलासा! होणार असा फायदा

Student admission । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागत आहे. विविध समाज घटकातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खूप महिन्यांचा कालावधी जातो. त्यामुळे हे प्रमाणपत्र सादर करण्यास सवलत मिळावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांकडून केली जात होती.

सध्या राज्यात दहावी, बारावी परीक्षांच्या निकालानंतर विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी ज्या संवर्गातून प्रमाणपत्र घेतले आहे.

त्यांच्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी आदेश काढले आहेत. याबाबतची सर्व माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आली आहे.

या संवर्गाला होणार फायदा

सरकारच्या या निर्णयाचा फायदा एससी, एसटी,ओबीसी, एनटी आदी आरक्षणासोबतच मराठा आणि आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास खूप अडचणी येतात. या काळात प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असायची. त्यामुळे अनेकदा प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची वेळ येते. आता सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील.

Leave a Comment