दिल्ली : ज्या प्रकारे रशियाने युक्रेनवर हमला करून तेथील काही भागांवर दावा सांगितला आहे, तसाच चीन भारताविरुद्ध करू शकतो, असा इशारा काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी दिला आहे. जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी ही माहिती दिली. “रशियाने असे म्हटले आहे की ते युक्रेनचे सार्वभौमत्व स्वीकारत नाही,” असे काँग्रेस नेते म्हणाले. रशियाला युक्रेन, नाटो आणि अमेरिका यांच्यातील आघाडी तोडायची आहे.
नेमका तसाच प्रकार चीन भारता विरोधात करू शकतो आहे, असे राहुल गांधी म्हणाले. लडाख आणि अरुणाचल प्रदेश या भागांजवळ चीनने आपले सैन्य तैनात केले आहे. त्यांच्या या कृत्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. पण आपल्याकडे रशिया आणि युक्रेनचा अनुभव आहे. ते येथे देखील लागू होऊ शकते. ते म्हणाले की, सरकार सत्य स्वीकारत नाही. मी त्यांना सत्य स्वीकारून त्यानुसार तयारी सुरू करण्यास सांगू इच्छितो. तुम्ही तयारी केली नाही तर परिस्थिती आणखी बिघडली तर तुम्ही संघर्ष करू शकणार नाही, असेही ते म्हणाले.
इतकेच नाही तर यावेळी राहुल गांधी यांनी भ
दशातील परिस्थितीची श्रीलंकेशी तुलना केली. ते म्हणाले की, श्रीलंकेत आज जे काही घडत आहे, ते सत्य बाहेर आले आहे. भारतातही सत्य बाहेर येईल. काय फरक आहे? भारत वेगवेगळ्या गटात विभागला गेला आहे. आधी एकच राष्ट्र असायचे, पण आता त्यात वेगवेगळे देश बनवण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वांना एकमेकांच्या विरोधात उभे केले जात आहे. आज जरी माझ्यावर विश्वास ठेवता येत नसला तरी २ ते ३ वर्षांनंतर ते दिसून येईल, असेही ते म्हणाले.
Trending
- Update on Adhaar Card: एकाच झटक्यात बंधन झाले निराधार; पहा ‘पॅन इंडिया’मध्ये मोदी सरकारने काय घेतलाय निर्णय
- Gautam Adani Biography: म्हणून झाले होते अदानींचे अपहरण; सिंगल क्लीकवर वाचा लाईफ स्टोरी झटक्यात
- Adani Group Shares: बाजाराला अदानी झटका; 2 लाख कोटीची धूळधाण, पहा कोणत्या शेअरची झालीय झटक्यात माती
- BBC documentary च नाही, म्हणून किशोरकुमारच्या गाण्यावरही आली होती बंदी; पहा रंजक माहिती
- Exploitation In Aksai Chin India Gold Mine: बाब्बो.. भारताच्या जिवावर चीन झालाय सोनेरी; पहा काय खेळ चालू आहे अक्साई भागात
- GeM वर होतेय सरकारी खरेदी; ग्रामपंचायतसह सर्वांना आहे उपयोगी, वाचा महत्वाची माहिती
- Auto Expo 2023: भारीच की, ४० मिनिटांच्या चार्जमध्ये ४०० किमी जाणार ‘ही’ कार, पहा काय अफलातून आहेत फीचर्सही
- Life’s Meanings| जीवन म्हणजे…