Stop Hair Fall : हल्ली अनेकजण केसगळतीने त्रस्त आहेत. काहीजण केसांची गळती थांबवण्यासाठी विविध उपाय करतात. पण तुम्ही आता सोप्या उपायांनी केसांची गळती थांबवू शकता. जाणून घ्या सविस्तर.
केसांना मजबूत करणारे पेय
बायोटिन युक्त पेय पिणे केस मजबूत करण्यासाठी त्याशिवाय केस गळणे टाळण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे पेय तयार करण्यासाठी तुम्हाला बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, कढीपत्ता आणि आवळा पावडरची गरज भासणार आहे.
बदाम
हे लक्षात घ्या की बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि बायोटिन असते. त्यामुळे तुमचे केस मजबूत होतातच पण खराब झालेले केस दुरुस्त होतात. हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी अर्धा कप बदाम घ्या.
कढीपत्ता
आपल्या केसांसाठी कढीपत्ता खूप फायदेशीर आहे. ज्यामुळे केसांची मुळे आणि छिद्र मजबूत होतात. त्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात.
आवळा पावडर
तुम्हाला तुमचे केस मजबूत करायचे असतील तर आवळा लावण्यासोबतच त्याचा आहारात समावेश करा. कारण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी तसेच अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. जे केसांच्या मुळांना मजबूत करत असते.
अक्रोड
अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते. जे केसांच्या मुळांना मजबूत करते आणि केस गळणे देखील कमी करते. आहारात अक्रोडाचा समावेश केला तर केस गळणे कमी होते.
भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात झिंक असते. ज्यामुळे केसांची मुळे निरोगी होऊन केसांची वाढ वाढते. अर्धा कप भोपळ्याचे दाणे घ्या.
असे तयार करा आरोग्यदायी पेय
केस मजबूत करण्यासाठी हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी अर्धी वाटी अक्रोड, अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया, एक चौथा कप कढीपत्ता पावडर, एक चौथा कप आवळा पावडर घ्या. या गोष्टी बारीक करून पावडर करून बरणीत साठवा. हे मिश्रण एका ग्लास पाण्यात मिसळून रोज प्या. यामुळे केस निरोगी आणि चमकदार होण्यास मदत होते. तसेच आरोग्याच्या इतर समस्या दूर होतील.