Stock Market Holiday: मोठी बातमी, आज शेअर बाजार राहणार बंद, ‘हे’ आहे कारण

Stock Market Holiday:  आज तूम्ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासह देशातील अनेक लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारात कुठल्याही कामकाज होणार नाही.

आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज दोन्ही बंद राहतील. यासह, इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, एसएलबी आणि चलन विभागातील व्यापार देखील बंद राहतील.

 महत्त्वाच्या जागांवर मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. यामध्ये मुंबई उत्तर, मुंबई पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य, धुळे, नाशिक, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि पालघर इत्यादी महत्त्वाच्या लोकसभा जागांचा समावेश आहे.

बीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 च्या कलम 25 अंतर्गत ही सुट्टी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानामुळे शेअर बाजारात कोणतेही कामकाज होणार नाही. यापूर्वी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनीही X वर पोस्ट करून लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित केले आहे.

या दिवशी बंद राहणार भारतीय शेअर बाजार 

17 जून 2024: बकरी ईद

17 जुलै 2024: मोहरम

15 ऑगस्ट 2024: स्वातंत्र्य दिन

2 ऑक्टोबर 2024: गांधी जयंती

1 नोव्हेंबर 2024: दिवाळी

15 नोव्हेंबर 2024: गुरु नानक जयंती

25 डिसेंबर 2024: ख्रिसमस

Leave a Comment