Diwali Festival: दिवाळी सणानिमित्त (Diwali Festival 2022) राज्य परिवहन महामंडळाने (State Road Transport Corporation) जादा वाहतुकीचे (Transport) नियोजन केले आहे. नगर विभागानेही पुणे (Pune) व अन्य शहरांसाठी जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. बुधवारपासून (दि.१९) पुण्याला जाण्या येण्यासाठी जादा वाहतूक सुरू केली आहे. नगर विभागाने (Ahmednagar Division) मंजुरी व्यतिरिक्त 49 जादा बसची व्यवस्था केली आहे. या व्यतिरिक्त अन्य शहरांसाठी जादा वाहतूक 17 ऑक्टोबरपासूनच सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, औरंगाबाद, परळी, जालना, नांदेड, गेवराई, परभणी, नाशिक, कोल्हापूर या शहरांचा समावेश आहे.
दिवाळी सण साजरा करण्यासाठी घरी जाण्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे बसस्टँडमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. नगर जिल्ह्यातून शिक्षण व रोजगारानिमित्त पुण्याला जाणाऱ्यांची संख्या अन्य शहरांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे फक्त पुण्याला जाण्या येण्यासाठी 49 जादा बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या जादा बस बुधवारपासून नगर शहरातील तारकपूरसह जिल्ह्यातील शेवगाव, श्रीरामपूर, जामखेड, कोपरगाव, पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, नेवासा, पाथर्डी, अकोले येथून सुटणार आहेत. पुणे व्यतिरिक्त अन्य शहरांसाठीही जिल्हाभरातून जादा वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
या जादा वाहतुकीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळेल असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, या काळात खासगी वाहतूकही जोरात सुरू असते. बसस्टँडच्या बाहेर खासगी ट्रॅव्हल्स व अन्य खासगी वाहने दिवसभर उभी असतात. एसटीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत प्रवासी घेऊन जातात. काही जण तर थेट बसस्टँडमध्ये येऊन प्रवासी घेऊन जातात. याचा फटका महामंडळाला नेहमीच बसतो. यंदाही तशी परिस्थिती निर्माण झाल्यास महामंडळाचे हक्काचे प्रवासी आणि हक्काचे उत्पन्नाला फटका निश्चित बसणार आहे. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांना ठोस कार्यवाही करणे गरजेचे राहणार आहे.
- Must Read : एसटी विलिनीकरणाबाबत समितीचा धक्कादायक निर्णय.. अहवालात काय म्हटलंय, वाचा..!
- Jalgaon News : दिवाळीसाठी ST महामंडळ सज्ज “या “डेपोतून सुटणार जादा गाड्या; 20 – 31 ऑक्टोबरदरम्यान धावणार अतिरिक्त बसेस
- Diwali Vacation Destinations: भारतातील “या “ठिकाणी दिवाळीचे वेगळेच वैभव पाहायला मिळते