State Assembly Election 2024 : लोकसभेबरोबर ‘या’ 4 राज्यांत विधानसभेच्या निवडणुका; आयोगाने केली घोषणा

State Assembly Election 2024 : संपूर्ण देशाचे लोकसभा निवडणुकांच्या तारखांकडे होते. आज या (State Assembly Election 2024) तारखांची घोषणा करण्यात आली आहे. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार (Lok Sabha Election) पडणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी याबाबत घोषणा केली आहे. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी एकाच दिवशी मतमोजणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीबरोबरच 4 राज्यांतील निवडणुकांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे.

Lok Sabha Election : नेता असो की कार्यकर्ता? आयोगाच्या ‘या’ 10 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवाच!

आंध्र प्रदेशमध्ये 18 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. 13 मे रोजी मतदान होणार आहे. अरुणाचल प्रदेशात 20 मार्च रोजी अधिसूचना निघेल आणि 19 एप्रिल रोजी मतदान होईल. सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी 19 मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल आणि या राज्यात 20 एप्रिल रोजी मतदान होईल. तसेच ओडिशा विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यासाठी 29 एप्रिल तर दुसऱ्या टप्प्यातील अधिसूचना 7 मे रोजी प्रसिद्ध होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान 25 मे तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होईल.

देशीत एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे, 25 मे आणि सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

या निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती राजीव कुमार यांनी दिली. देशभरात मतदानासाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतदारांना काही अडचणी आल्यास, मतदारांच्या काही तक्रारी असतील तर काय करता येईल या महत्वाच्या गोष्टींचीही माहिती दिली.

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान; जाणून घ्या, कोणत्या मतदारसंघात कधी होणार मतदान?

Leave a Comment