ST Employee Bonus: एसटी कर्मचाऱ्यांसाठी (ST Employee) आनंदाची बातमी (Good News) आहे. यंदाच्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (Maharashtra State Road Transport Corporation) एसटीच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला डबल दिवाळी बोनस (Diwali Bonus) देण्याची घोषणा केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे ८७ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी वर्गाला होणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत मंगळवारी घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी बोनस म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना २,५०० रुपये आणि अधिकाऱ्यांना ५ हजार रुपयांची घोषणा करण्यात आली होती. पण या घोषणेनंतर राज्य सरकारवर जोरदार टीका होऊ लागली. २,५०० रुपये बोनस पुरेसा नसल्याचे सांगत राज्य सरकारने (State Govt) आपल्या निर्णयावर फेरविचार करत नव्याने बोनस जाहीर करावा अशी मागणी केली जात होती. सर्वस्तरावर होणाऱ्या टीकेनंतर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये वाढ केली
एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना (ST Employees and Officers) बोनस देण्यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्माचारी आणि अधिकाऱ्यांना रक्कम स्वरुपात दिवाळी बोनस दिला जातो. यावर्षी एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सरसकट ५ हजार रुपये दिवाळी भेट देण्यात येणार आहे. ही बोनसची रक्कम एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये लवकरच जमा केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- हेही वाचा:
- Diwali Styling Tips: यंदाच्या दिवाळीत “या “टिप्सचा अवलंब करा ,ऑफिस असो की घरातील पार्टी सगळीकडे दिसाल स्टाईलिश
- Heavy Rain: अबब… या ठिकाणी पुन्हा जोरदार पाऊस; शहर झाले जलमय
- Business Stock News : म्हणून झाली श्री सिमेंटच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांनी घसरण
- Railway News: देशाला मिळाली चौथी वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा सिग्नल, वाचा सविस्तर..