SSC CGL 2024: नोकरीची सुवर्णसंधी! 17,727 पदांसाठी बंपर भरती, जाणुन घ्या सर्वकाही

SSC CGL 2024: तुम्ही देखील सरकारी नोकरी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा फायदा घेत तुम्ही केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरी करू शकतात.

माहितीसाठी जाणुन घ्या, स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) कंम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल (CGL) साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या अंतर्गत गट ब आणि गट क च्या एकूण 17,727 पदांवर भरती होणार आहे. पात्र उमेदवार ssc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

24 जून 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2024 आहे. अर्ज फी भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2024 निश्चित करण्यात आली आहे.

एसएससी 10 ते 11 ऑगस्ट या कालावधीत अर्जातील दुरुस्तीसाठी दुरुस्ती विंडो उघडेल. तर टियर 1 (संगणक आधारित परीक्षा) सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आणि टियर 2 परीक्षा डिसेंबरमध्ये होईल. अर्ज करण्यापूर्वी, आपण सर्व आवश्यक पात्रता पूर्ण केल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

SSC CGL पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 32 वर्षे दरम्यान असावे.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. तुम्हाला या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल कारण ऑफलाइन अर्ज नाकारले जातील.

Leave a Comment