Sri Lanka : आजच्या पाकिस्तानची (Pakistan) जी स्थिती आहे ती काही काळापूर्वी श्रीलंकेचीही (Sri Lanka) होती. श्रीलंकेत दीर्घकाळ चाललेली आर्थिक अराजकता आणि वाईट धोरणांमुळे देशावर सर्वात मोठे आर्थिक संकट आले. परिस्थिती इतकी बिकट झाली की देश दिवाळखोर घोषित झाला. या घटनेला बराच काळ लोटूनही परिस्थिती बदललेली नाही.
श्रीलंकेतील परिस्थिती इतकी बिकट आहे की लोक सतत रस्त्यावर निदर्शने करत आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. यामुळे शेकडो लोक अजूनही उपाशी आहेत. चीनच्या (China) कर्जाच्या जाळ्यात अडकल्याने, श्रीलंका आधीच गरिबीकडे वाटचाल करत होता, कोरोना महामारीमुळे (Corona) श्रीलंकेची स्थिती बिकट झाली.
देशातील परकीय चलनाचा साठा संपुष्टात आल्याने जीवनावश्यक वस्तू आयात ठप्प झाली आहे. त्याचवेळी राजकीय वर्तुळात गदारोळ झाल्याने राष्ट्रपतीही देशातून पळून गेले. रशिया-युक्रेन युद्धानेही (Russia Ukraine War) या परिस्थिती अधिकच खराब झाली.
- Gold Investment साठी ‘हे’ आहेत खास पर्याय; काळजी नको, मिळेल चांगला नफा
- IPL 2023 : सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ? ; रोहित शर्मा नाही तर..
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
2023 मध्येही श्रीलंकेतील परिस्थिती जैसे थे आहे. अन्न असुरक्षितता, गरिबी, उपजीविकेचे संकट आणि जीवनावश्यक वस्तू कमतरता यामुळे काळजी अधिकच वाढली आहे. या सगळ्यांचा फटका गरीब आणि दुर्बल घटकाला बसत आहे.
श्रीलंकेतील महागाईबद्दल बोलायचे तर गेल्या वर्षीच्या तुलनेत महागाईचा (Inflation) दर कमी झाला आहे. अन्नधान्याची टंचाई आणि वाढत्या किमतींमुळे लोकसंख्येचा एक भाग त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकत नाही. श्रीलंकेत दैनंदिन खाद्यपदार्थांच्या किमतीबद्दल बोलायचे तर दूध 420 रुपये प्रति लिटर, बटाटा 341 रुपये किलो, तांदूळ 227 रुपये किलो, चिकन 1312 रुपये किलो, टोमॅटो 412 रुपये किलो, संत्रा 1082 रुपये प्रति किलो या दराने मिळत आहे.