Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IND vs SA: अर्र… कर्णधार पंत तिसऱ्या T20 मध्येही ‘या’ खेळाडूला संधी देऊ शकणार नाही!

मुंबई –  भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसरा सामना आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या T20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. हा सामना भारतासाठी ‘करा किंवा मरो’ सारखा असेल. आणखी एका पराभवामुळे टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

Advertisement

कर्णधार पंत तिसऱ्या T20 मध्येही या खेळाडूला संधी देऊ शकणार नाही!
स्फोटक अष्टपैलू दीपक हुडाला (Deepak Hooda) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार नाही. कर्णधार ऋषभ पंत या खेळाडूला इच्छा असूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकणार नाही. या सामन्यात फक्त अक्षर पटेललाच कायम ठेवता येईल, जो गोलंदाजीत दीपक हुड्डापेक्षा सरस असेल. प्लेइंग इलेव्हनमध्ये दिनेश कार्तिकसारखा फिनिशर असल्याने दीपक हुड्डासारख्या अतिरिक्त फलंदाजाची गरज भासणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात दिनेश कार्तिकला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरवले जाऊ शकते.

Advertisement

फलंदाजीबरोबरच गोलंदाजीही करू शकतो
दीपक हुडा गोलंदाजीसोबतच फलंदाजीही करू शकतो. IPL 2022 हा दीपक हुडाच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम हंगाम ठरला आहे. या मोसमात त्याने 15 सामन्यात 32.21 च्या सरासरीने 451 धावा केल्या. त्याने या मोसमात 136.67 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 4 अर्धशतकेही झळकावली आहे.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग 11:
ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, उमरान मलिक आणि भुवनेश्वर कुमार.

Advertisement
Advertisement

Leave a Reply