Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

गुजरातसाठी ‘हा’ जादुई गोलंदाज ठरणार सर्वात मोठा धोका; प्लेऑफचा आहे बादशाह..!

मुंबई –  IPL 2022 चा पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. या सामन्यातील विजयी संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. गुजरात टायटन्ससाठी हा सामना सोपा असणार नाही, कारण राजस्थान रॉयल्सच्या संघात असा जादुई गोलंदाज आहे जो प्लेऑफमध्ये अतिशय धोकादायक खेळ दाखवतो, हा खेळाडू या सामन्यात गुजरातसाठी सर्वात मोठा धोका असेल.

Advertisement

प्लेऑफमध्ये सर्वाधिक विकेट्स
आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफ सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू यावेळी राजस्थान रॉयल्सच्या संघात खेळत आहे. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा आयपीएल 2022 मध्ये राजस्थान संघाचा भाग आहे. अश्विन (R.Ashwin) प्लेऑफमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे, या सामन्यात तो गुजरातसाठी सर्वात मोठा धोका बनू शकतो. अश्विनने प्लेऑफ सामन्यांमध्ये एकूण 18 विकेट घेतल्या होत्या.

Advertisement

रविचंद्रन अश्विन प्लेऑफ सामन्यांमध्ये सर्वात धोकादायक गोलंदाज असल्याचे सिद्ध झाले आहे. अश्विनने आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांमध्ये तीन वेळा 3-3 विकेट घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारा अश्विन हा भारताकडून एकमेव आणि आयपीएलच्या इतिहासातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनशिवाय ड्वेन ब्राव्होने ही कामगिरी केली आहे. या दोन गोलंदाजांशिवाय जगातील कोणत्याही गोलंदाजाने आयपीएलमध्ये अशी कामगिरी केलेली नाही. अश्विनने आयपीएलमध्ये राजस्थानपूर्वी चेन्नई (CSK), पंजाब किंग्ज (PBKS) आणि दिल्ली (DC) संघांसाठी खेळला आहे.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

15 व्या हंगामातील अश्विनची आकडेवारी
IPL 2022 मध्ये, रविचंद्रन अश्विनने लीग टप्प्यातील 14 सामन्यांमध्ये 7.14 च्या इकॉनॉमीने धावा खर्च करून 11 विकेट घेतल्या आहेत. फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर या 14 सामन्यांमध्ये रविचंद्रन अश्विनच्या बॅटने 30.50 च्या सरासरीने आणि 146.40 च्या स्ट्राईक रेटने 183 धावा केल्या आहेत. या मोसमात त्याने अर्धशतकही केले आहे. हा मोसम रविचंद्रन अश्विनसाठी चेंडू आणि बॅट या दोन्ही बाबतीत उत्तम ठरला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply