Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022 : विजय मुंबईचा, पराभव दिल्लीचा पण, बंगळुरूला मिळाले प्लेऑफचे तिकीट; जाणून घ्या, कसे ते..

मुंबई – आयपीएलमध्ये काल मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव केला. मुंबईच्या या विजयासह दिल्लीचे प्लेऑफमध्ये (Playoff) पोहोचण्याचे स्वप्न भंगले, तर आरसीबीला बाद फेरीचे तिकीट मिळाले. प्लेऑफमध्ये पोहोचणारा बंगळुरू हा चौथा संघ ठरला आहे. त्यांच्याआधी गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स नॉकआउट सामन्यांसाठी पात्र ठरले आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने मुंबईसमोर 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते. संघाने हे लक्ष्य साध्य करत विजय मिळवला.

Advertisement

लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) फक्त 2 रन करून बाद झाला. यानंतर इशान किशनने (Ishan Kishan) 48 आणि डेवाल्ड ब्रेविसने 37 धावा केल्या. दोन्ही खेळाडूंची ही खेळी अतिशय संथ होती, त्यामुळे मुंबई सामन्यात पिछाडीवर पडला होतो. पण शेवटी टीम डेव्हिडने 34 धावांची खेळी करत दिल्लीचा विजय हिसकावून घेतला.

Advertisement

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी योग्य असल्याचे दाखवून दिले. बुमराहने चार ओव्हरमध्ये 25 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. दिल्लीची (Delhi Capitals) धावसंख्या 8.4 ओव्हरमध्ये 4 बाद 50 अशी होती पण रोव्हमन पॉवेलने 43 आणि कर्णधार ऋषभ पंतने 39 धावा केल्या. या दोघांनी 75 धावांची भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढले. दिल्लीला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्वाचे होते. मुंबईतर्फे रमणदीप सिंगने दोन ओव्हरमध्ये 29 धावा देत दोन विकेट घेतल्या.

Loading...
Advertisement

दरम्यान, आयपीएलमधून मुंबई इंडियन्सचा संघ आधीच बाहेर पडला होता. त्यामुळे दिल्ली विरुद्धच्या सामन्यात पराभव झाला असता तरी काही फरक पडत नव्हता. मात्र,  मुंबईने सामना जिंकून दिल्ली संघाच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या प्रयत्नांना जोरदार झटका दिला. कारण, या पराभवामुळे दिल्ली संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्याऐवजी आता बंगळुरूचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे.

Advertisement

अंबाती रायुडू आयपीएलमधून निवृत्त होणार? CSK चे CEO म्हणाले..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply