Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ पराभवानंतर धोनीचा संघ आयपीएलमधून बाहेर.. धोनीने सांगितले ‘हे’ महत्वाचे कारण..

मुंबई – यंदाच्या आयपीएलमध्ये गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. शुक्रवारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) पराभव करताच महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वातील हा संघ आयपीएलमधून बाहेर पडला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली होती. पण नंतर संघाची फलंदाजी ढासळली आणि धोनीच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सामन्यानंतर कर्णधार धोनीनेही पराभवाचे कारण मान्य केले.

Advertisement

सामन्यानंतर धोनी म्हणाला, की मला वाटतं की एखादा फलंदाज टिकून राहिला असता तर वेगाने रन बनवता आले असते. पण आम्ही आमची विकेट गमावताच भूमिका आणि जबाबदारी बदलली आणि त्यामुळे आमच्यासाठी पुढचा रस्ता कठीण झाला. आम्ही 10 ते 15 रन कमी केले. सीएसकेसाठी हा आयपीएल (IPL) इतिहासातील सर्वात खराब हंगाम होता. संघाने लीग टप्प्यातील 14 पैकी 10 सामने गमावले. गतविजेता असूनही प्लेऑफमध्ये (Playoff) पोहोचण्यात हा संघ सपशेल अपयशी ठरला. धोनीलाही यावेळी विशेष काही करता आले नाही. असे असले तरी संघातील युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीत बरीच सुधारणा केल्याचे धोनी म्हणाला.

Advertisement

तो म्हणाला, की “तरुण खेळाडूंना प्रत्येक सामन्यात संधी मिळाली, ते शिकले. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे मुकेश चौधरी. तो जवळपास सर्व सामन्यात होता. पण त्याच्याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो पहिल्या सामन्यापेक्षा शेवटच्या सामन्यात खूप वेगळ होता. पुढील आयपीएलमध्ये तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल.

Loading...
Advertisement

आता आयपीएलमधून हा संघ बाहेर पडला आहे. धोनीच्या कामगिरीतही सातत्य राहिलेले नाही. त्याचा परिणाम यंदा दिसून आला आहे. त्यामुळे पुढील आयपीएलसाठी संघाला आपल्या रणनितीमध्ये मोठे बदल करावे लागतील हे मात्र नक्की.

Advertisement

आशा जिवंत ठेवण्यासाठी मुंबईचे इंडियन्स चेन्नईच्या ‘सुपर किंग्स’शी भिडणार; जाणुन घ्या डिटेल्स

Advertisement
Advertisement

Leave a Reply