Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी! T20 संघातून रोहित शर्मा आउट? ‘हा खेळाडू होणार भारताचा कर्णधार

मुंबई –  9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत (T-20 Series) भारतीय संघातील (Team India) अनेक मोठे खेळाडू दिसणार नाहीत. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) या मालिकेत सहभागी होणार नाही. इंग्लंड दौरा, आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक लक्षात घेऊन निवड समिती प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार करत आहेत. अशा स्थितीत जाणून घ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व कोण करू शकते.

Advertisement

आयपीएल 2022 (IPL 2022) नंतर, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार केएल राहुल, ऋषभ पंत, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. अशा स्थितीत टीम इंडियाचा कर्णधार कोण असेल, हा मोठा प्रश्न आहे, पण संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी यावर तोडगा काढला आहे. क्रिकबझच्या अहवालावर विश्वास ठेवला तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी शिखर धवनला (Shikhar Dhawan) कर्णधारपद मिळू शकते.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

संघात युवा, अनुभव आणि आयपीएलमधील अपवादात्मक कामगिरीचे मिश्रण असेल. टिळक वर्मा, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, रुतुराज गायकवाड, प्रशांत कृष्णा आणि आवेश खान यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, तर शिखर धवन, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक आणि भुवनेश्वर कुमार यांना टी-20 संघात स्थान मिळू शकते. श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेलेल्या संघाचा कर्णधार असलेल्या धवनचे कर्णधारपदावर पुनरागमन होऊ शकते. त्या दौऱ्यात संघाने एक मालिका जिंकली आणि एक गमावली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply