Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

…तर KKR होणार प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; जाणून घ्या समीकरण

मुंबई –  कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हा आयपीएल 2021 चा (IPL 2021) उपविजेता संघ होता. इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील संघाने सुरुवातीला चांगली कामगिरी केली नाही, पण नंतर सलग सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आणि नंतर अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. यावेळी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) संघाचा कर्णधार असून केकेआरची स्थिती अत्यंत नाजूक आहे. कोलकाताने त्यांचे 9 सामने खेळले आहेत, परंतु एक चूक संघाला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकून देऊ शकते.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

वास्तविक, आयपीएल 2022 मध्ये कोलकाताच्या संघाने चांगली सुरुवात केली. संघाने पहिल्या चारपैकी तीन लढती जिंकल्या होत्या, मात्र त्यानंतर सलग पाच सामन्यांत कोलकाताला पराभवाचा सामना करावा लागला. आता संघाचे केवळ 5 सामने शिल्लक आहेत आणि या उर्वरित पाच सामन्यांमध्ये संघ एकही सामना हरला तर संघ 16 गुणांपर्यंत पोहोचू शकणार नाही. या स्थितीत केकेआर आयपीएल 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर जाईल.

Advertisement

सध्या, KKR च्या खात्यात फक्त 6 गुण आहेत आणि संघ IPL 2022 च्या गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर आहे. संघाचा निव्वळ धावगतीही तितकासा चांगला नाही. अशा स्थितीत संघाला उरलेले सामने केवळ जिंकावे लागणार नाहीत, तर नंतर फलंदाजी करताना मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल किंवा सामना पटकन जिंकावा लागेल. पाहिले तर केकेआरला योग्य संयोजन मिळत नाही. सलामीच्या जोडीची सर्वात मोठी अडचण दिसून आली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply