Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ऋषभ पंतला ‘ती’ चूक पडली महाग: BCCI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; दिल्लीला बसला फटका

मुंबई – राजस्थानविरुद्धच्या (RR) सामन्यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi capitals) कर्णधार ऋषभ पंत (Rishabh pant) याने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत क्रीजवर उपस्थित फलंदाजांना परत बोलावण्याचे संकेत दिले होते. त्याचवेळी संघाचा आणखी एक खेळाडू शार्दुल ठाकूरही (Shardul Thakur) आपल्या कर्णधाराला पाठिंबा देत पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना दिसला. एवढेच नाही तर संघाचे फलंदाजी प्रशिक्षक एक पाऊल पुढे टाकत कर्णधाराच्या सांगण्यावरून मैदानात जाऊन अंपायरशी वाद घालताना दिसले. या सर्व वादानंतर आता सर्व सदस्यांना आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने शिक्षा ठोठावली आहे.

Advertisement

ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर आणि प्रवीण अमरे यांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. प्रवीण अमरेवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे, तर दुसरीकडे पंतला सामन्याच्या शुल्काच्या 100% दंड ठोठावण्यात आला आहे. शार्दुल ठाकूरला 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांना त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे आणि या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर एका सामन्याची बंदी देखील ठोठावण्यात आली आहे. अमरे यांनी आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 2 चा गुन्हा स्वीकारला आहे.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

पंतने त्याच्यावर लादलेल्या आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.7 अंतर्गत लेव्हल 2 चा गुन्हा स्वीकारला आहे आणि त्याची स्वीकृती देखील स्वीकारली आहे. याशिवाय, शार्दुलला आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला असून, लेव्हल 2 चा गुन्हा मान्य केला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply