मुंबई – IPL 2022 चा थरार शिगेला पोहोचला आहे. सर्वच संघ एकमेकांविरुद्ध विजय मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. आयपीएलच्या या मोसमातील 33 वा सामना CSK आणि MI यांच्यात DY पाटील स्टेडियमवर खेळला गेला. सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनीने (M.S.Dhoni) शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला 3 गडी राखून विजय मिळवून दिला. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने 7 बाद 155 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईच्या संघाकडून ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा सलामीला फलंदाजीला आले. ऋतुराज गायकवाडने खाते न उघडता पॅव्हेलियनचा रस्ता धरला. तर दुसरा सलामीवीर रॉबिन उथप्पाने 30 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मिचेल सँटनरने 11 धावांची खेळी खेळली. मधल्या फळीत अंबाती रायुडूने 40 धावांची मौल्यवान खेळी खेळली. माजी कर्णधार एमएस धोनीने 13 चेंडूंचा सामना केला आणि 28 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. पावर प्ले मध्ये विकेट गमावलं मुंबईची सामन्यातून पीछेहाट झाली आणि CSK ची पकड मजबूत झाली.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
सीएसकेच्या विजयात गोलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. मुकेश चौधरीने 3 विकेट्स घेतल्या. ड्वेन ब्राव्होने 2 विकेट्स घेतल्या. तर मिचेल सँटनर आणि महेश टीक्षाना यांनी प्रत्येकी एक विकेट घेत मुंबईची फलंदाजी उद्ध्वस्त केली.