मुंबई – चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सलामीवीर डेव्हन कॉनवेने (Devon Conway) आयपीएल 2022 चा(IPL 2022) बायो बबल सोडला आहे. कॉनवे पुढील आठवड्यात निवडीसाठी उपलब्ध होणार नाही. लग्नासाठी तो दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला कॉनवे न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.आयपीएलच्या 15व्या हंगामात त्याने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे.
ESPNcric Info च्या अहवालानुसार, हा किवी सलामीवीर 24 एप्रिल रोजी CSK संघात पुन्हा सामील होईल. मात्र, कोरोना प्रोटोकॉलनुसार दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर या खेळाडूला तीन दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. अशा स्थितीत हा डावखुरा फलंदाज दोन सामन्यांतून बाहेर असेल. गतविजेत्या सीएसकेचा सामना 21 एप्रिलला (गुरुवार) मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) होईल तर चेन्नईचा सामना 25 एप्रिलला पंजाब किंग्जशी (Punjab kings) होईल.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
आता पर्यंत या हंगामात CSK ला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. प्ले ऑफ ची आशा राखण्यासाठी चेन्नईला आज मुंबई इंडियन्स ला हरावे लागणार आहे.