मुंबई- IPL 2022 मध्ये आज धमाकेदार सामना खेळवला जाणार आहे. हा सामना लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) यांच्यात होणार आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांना कडवी टक्कर देणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये कोण श्रेष्ठ याची लखनौ आणि बंगळुरू यांच्यात स्पर्धा होणार आहे. केएल राहुलचा संघ रन नेटच्या आधारावर आरसीबीपेक्षा पुढे असून तिसऱ्या स्थानावर आहे. तर फाफ डु प्लेसिसचा संघ आरसीबी पॉईंट्स तेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. या सामन्यापूर्वी आम्ही तुम्हाला दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल सांगत आहोत.
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गेल्या सामन्यात त्याने मुंबईविरुद्ध 103 धावांची इनिंग खेळली होती. तो सध्या या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू आहे. या सामन्यात लखनौने रोहित शर्माच्या संघाचा 18 धावांनी पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात तो पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यांच्याशिवाय क्विंटन डी कॉकही चांगलाच फॉर्मध्ये आहे.
दिनेश कार्तिकचा जबरदस्त फॉर्म कायम
दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. 16 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा 16 धावांनी पराभव केला. दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांनी बंगळुरूसाठी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कार्तिकने तुफानी फलंदाजी करताना 34 चेंडूत 66 धावा केल्या. यापूर्वीच्या सामन्यांमध्येही त्याने अशीच खेळी केली आहे. संघात आल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलही शानदार फलंदाजी करत आहे. एकूणच या सामन्यातील लखनौचा रस्ता सोपा असणार नाही.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
लखनौ सुपर जायंट्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, जेसन होल्डर, क्रुणाल पंड्या, दुष्मंता चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संभाव्य प्लेइंग इलेव्हन: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज