Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. मॅच जिंकून ही लखनौला बसला धक्का; कॅप्टन केएल राहुलला लाखो रुपयांचा फटका

मुंबई –  शनिवारी (16 एप्रिल) झालेल्या आयपीएल(IPL 2022) सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने (LSG) मुंबई इंडियन्सचा (MI) पराभव केला. ब्रेबॉर्न स्टेडियमवरील या विजयानंतर लखनौच्या संघाला धक्का बसला. संघाचा कर्णधार केएल राहुलला (K.L.Rahul) स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलमध्ये तिसरे शतक झळकावणाऱ्या राहुलला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Advertisement

आयपीएलच्या किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आचारसंहितेअंतर्गत लखनऊ सुपर जायंट्सचा हा हंगामातील पहिला गुन्हा आहे, त्यामुळे राहुलला फक्त 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राहुलच्या आधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला दोनदा आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला एकदा दंड ठोठावण्यात आला आहे.

Advertisement

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर मुंबईचा कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकांत 4 बाद 199 धावा केल्या. त्यासाठी कर्णधार केएल राहुलने 60 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. त्याचे मुंबईविरुद्ध आयपीएलमधील हे दुसरे शतक आहे. यापूर्वी 2019 मध्ये त्याने वानखेडे स्टेडियमवर शतक झळकावले होते. राहुलशिवाय मनीष पांडेने 29 चेंडूत 38 धावा केल्या. मुंबईकडून जयदेव उनाडकटने दोन गडी बाद केले.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 181 धावाच करू शकला. त्याच्याकडून सूर्यकुमार यादवने 37 धावा केल्या. त्याच्याशिवाय डेवाल्ड ब्रेविसने 13 चेंडूत 31 धावा केल्या. टिळक वर्माने 26 आणि किरॉन पोलार्डने 25 धावा केल्या. लखनौकडून आवेश खानने सर्वाधिक तीन बळी घेतले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply