Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

KKR देणार रहाणेला डच्चू: तर हैदराबाद मध्ये होणार ‘हा’ मोठा बदल; जाणून घ्या playing 11

मुंबई – आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये कोलकाता संघाने (KKR) आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पाचपैकी तीन सामने जिंकल्यानंतर हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. हैदराबादविरुद्धच्या (SRH) सहाव्या सामन्यातही या संघाला गुणतालिकेत पहिले स्थान पटकावायचे आहे. मात्र, कोलकातासाठी ते सोपे नसेल. हैदराबाद संघाने सलग दोन सामने जिंकले आहेत.

Advertisement

अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन ही सलामीची जोडी सुरेख फॉर्ममध्ये असून उर्वरित फलंदाजही चांगली कामगिरी करत आहेत. दुसरीकडे, कोलकाताचे गोलंदाज गेल्या सामन्यात फ्लॉप ठरले आणि त्यांनी दिल्लीविरुद्ध 20 षटकात 200 हून अधिक धावा दिल्या. या लक्ष्याचा पाठलाग फलंदाजांना करता आला नाही.या सामन्यात दोन्ही संघ काही बदलांसह जाऊ शकतात. कोलकाताचा संघ बदलला तर त्यात किमान दोन बदल होतील. हैदराबादमध्येही बदल होऊ शकतो.

Advertisement

कोलकाता नाईट रायडर्ससाठी अजिंक्य रहाणे सातत्याने फ्लॉप ठरला आहे. त्याने आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावलेले नाही. पाच डावांमध्ये त्याच्या बॅटमधून एकही मोठी खेळी आली नाही. त्याच्या जागी अॅरॉन फिंचला संधी दिली जाऊ शकते. फिंच आल्यावर सॅम बिलिंग्जला जावे लागेल आणि त्याच्या जागी शेल्डन जॅक्सन खेळेल. कारण आयपीएलमध्ये एका संघाकडून फक्त चार विदेशी खेळाडू खेळू शकतात. सध्या कोलकाताकडून बिलिंग्स, रसेल, नरेन आणि कमिन्स खेळत आहेत.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

व्यंकटेश अय्यरनेही एक सामना वगळता फारसे काही केले नाही, पण तो खेळणार याची खात्री आहे. दुसरीकडे कर्णधार तिसर्‍या क्रमांकावर श्रेयस, चौथ्या क्रमांकावर राणा आणि शेवटचा रसेल योग्य पद्धतीने सामना पूर्ण करत आहे. उमेश, कमिन्स, नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांच्या उपस्थितीत कोलकाताची गोलंदाजी मजबूत आहे. त्यात बदल होण्याची शक्यता नाही. रसिक सलामच्या जागी एका फलंदाजाला संधी दिली जाऊ शकते.

Loading...
Advertisement

हैदराबादमध्ये समदच्या जागी गोपाल खेळू शकतो
सलामी जोडी अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी सनरायझर्स हैदराबादसाठी शानदार फलंदाजी केली आहे. यानंतर राहुल त्रिपाठीही चांगल्या लयीत आहे, मात्र तो गेल्या सामन्यात जायबंदी झाला होता. तो बरा झाल्यावरच हा सामना खेळेल. मार्कराम आणि पूरन यांनीही पकड घेतली आहे. दोन्ही फलंदाजांना आणखी संधी मिळण्याची खात्री आहे. मात्र, अब्दुल समद सध्या वाईट टप्प्यातून जात असून त्यांच्या जागी श्रेयस गोपालला संधी दिली जाऊ शकते.

Advertisement

हैदराबादची गोलंदाजी भक्कम असून बदलाची शक्यता नाही. भुवनेश्वर कुमार, मार्को येन्सन, उमरान मलिक आणि टी नटराजन चांगल्या फॉर्मात आहेत. कोणत्याही संघाला नेस्तनाबूत करण्याची ताकद त्यांच्यात आहे.

Advertisement

हैदराबादसाठी संभाव्य Playing 11
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, अब्दुल समद/श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, मार्को येनसेन, उमरान मलिक, टी नटराजन.

Advertisement

कोलकात्याची संभाव्य Playing 11
व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे/आरोन फिंच, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, सॅम बिलिंग्स/शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), रिंकू सिंग/रसिक सलाम, पॅट कमिन्स, सुनील नरेन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

Advertisement
Advertisement

Leave a Reply