Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी! ICC चेयरमैन पदासाठी BCCI अध्यक्ष देणार जय शाह यांना टक्कर?

मुंबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदासाठी, सध्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah) यांच्यात स्पर्धा होऊ शकते. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांना त्यांचा कार्यकाळ वाढवायचा नाही. बार्कले नोव्हेंबर 2020 मध्ये ICC चे अध्यक्ष झाले. त्यांनी भारताच्या शशांक मनोहर यांची जागा घेतली, ज्यांनी जुलै 2020 मध्ये त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.

Advertisement

द टेलिग्राफ या कोलकाता येथील आघाडीच्या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली आणि सचिव जय शाह या दोघांना आयसीसीचे पुढील अध्यक्ष व्हायचे आहे. गांगुली आणि शाह आयसीसीचे नवे अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत पुढे असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. या दोघांपैकी कोणीही पुढील आयसीसी अध्यक्ष बनल्यास, आयसीसीच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणारे ते भारतातील पाचवे अधिकारी असतील. यापूर्वी जगमोहन दालमिया (1997-2000), शरद पवार (2010-2012), एन श्रीनिवासन (2014-2015) आणि शशांक मनोहर (2015-2020) यांनी हे पद भूषवले आहे.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

सध्याचे ICC चेअरमन, बार्कले, ऑकलंड येथील व्यावसायिक वकील आहेत. अहवालात पुढे म्हटले आहे की, व्यावसायिक बांधिलकीमुळे बार्कले यांना त्यांचा कार्यकाळ वाढवायचा नाही आणि अशा परिस्थितीत नोव्हेंबर 2022 मध्ये आयसीसीला नवीन अध्यक्ष मिळू शकतो. आयसीसी अध्यक्षाची निवड दोन वर्षांसाठी केली जाते आणि त्याला सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी वाढवता येत नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply