Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

धोनीच्या निशाण्यावर आणखी एक विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरणार दुसरा भारतीय

मुंबई – आयपीएल 2022 (IPL 2022) चा 11 वा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात सीएसकेचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (M.S.Dhoni) नावावर आणखी एक विक्रम असेल. धोनी आज त्याच्या T20 कारकिर्दीतील 350 वा सामना खेळणार असून अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरणार आहे. आतापर्यंत 350 हून अधिक टी-20 सामने खेळणारा रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे. रोहित 372 सामन्यांसह अव्वल स्थानावर आहे.

Advertisement

सर्वाधिक T20 सामने खेळलेले भारतीय खेळाडू

Advertisement

रोहित शर्मा – 374
एमएस धोनी – 349*
सुरेश रैना – 336
दिनेश कार्तिक – 329
विराट कोहली – 328

Loading...
Advertisement

धोनीच्या T20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या 349 सामन्यांमध्ये 7001 धावा केल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने 6 चेंडूत 16 धावा केल्या आणि 7000 धावांचा टप्पा पार केला. या मोसमात आतापर्यंत धोनी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, त्याने KKR विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात 38 चेंडूत 50 धावांची खेळीही खेळली होती.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज या संघांबद्दल बोलायचे झाले तर सीएसकेने हंगामातील पहिले दोन सामने गमावले आहेत, तर स्पर्धेची सुरुवात विजयाने करणाऱ्या पंजाब किंग्जला शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. . आजचा सामना जिंकून दोन्ही संघांना पुन्हा विजयी मार्गावर यायचे आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply