Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

खरचं का? चहलच्या दबावामुळे जोस बटलरने झळकावले शतक; जाणुन घ्या संपूर्ण प्रकरण

मुंबई – राजस्थान रॉयल्सचा (RR) सलामीवीर जोस बटलरने (joss butler ) IPL 2022 चे पहिले शतक झळकावले. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) 68 चेंडूत 100 धावांची धडाकेबाज खेळी खेळून संघाला 23 धावांनी मोसमातील दुसरा विजय मिळवून दिला. या विजयानंतर बटलर युझवेंद्र चहलसोबत (Yuzvendra Chahal) संवाद साधताना दिसला. यादरम्यान, या सलामीवीराने मजेशीरपणे सांगितले की, युझवेंद्र चहलनेही सलामी दिली पाहिजे, ज्याच्या दबावामुळे त्याला शतक करण्याची प्रेरणा मिळाली.

Advertisement

आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये बटलर म्हणाला, “नक्कीच! या वर्षी आल्यापासून तू सलामीच्या जागेवर दबाव टाकत आहेस. तुला बाहेर ठेवण्यासाठी काही धावा करण्याची गरज होती.”

Advertisement

जोस बटलरने आपल्या शतकी खेळीत 11 चौकार आणि 5 षटकार ठोकले. आयपीएलमधील बटलरचे हे दुसरे शतक ठरले. दुसरीकडे, युझवेंद्र चहलबद्दल बोलायचे झाल्यास, या फिरकीपटूनेही राजस्थान रॉयल्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. चहलने 4 षटकात 26 धावा देत दोन बळी घेतले. यादरम्यान तो हॅट्ट्रिकवर होता, मात्र करुण नायरच्या चुकीमुळे त्याला हॅट्ट्रिक पूर्ण करता आली नाही.

Loading...
Advertisement

बटलर त्याच्या शतकाविषयी म्हणाला, की “आज खूप मजा आली. जेव्हा तुम्ही प्रथम फलंदाजी करता तेव्हा चांगली धावसंख्या कोणती असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि मला वाटले की आम्ही चांगली धावसंख्या केली आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने मुंबईसमोर विजयासाठी 194 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येसमोर मुंबईला निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 170 धावा करता आल्या.

Advertisement
Advertisement

Leave a Reply