Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

धोनी रचणार इतिहास?; कोहली- रोहितच्या ‘या’ खास क्लबमध्ये मिळणार प्रवेश

मुंबई – आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आज या हंगामातील त्यांचा दुसरा सामना लखनऊ सुपर जायंट्ससोबत (LSG) खेळणार आहे. यादरम्यान रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) नेतृत्वाखाली सीएसकेला पहिला विजय मिळवायचा आहे. मात्र, लीगमधील नवीन संघ लखनौ सुपर जायंट्सवर मात करणे त्याच्यासाठी सोपे नसेल.

Advertisement

चार वेळचा चॅम्पियन चेन्नई यावेळी एका नवीन कर्णधारासह मैदानात उतरला आहे तर महेंद्रसिंग धोनी (M.S.Dhoni) हा खेळाडू म्हणून खेळत आहे. 40 वर्षीय धोनीने मोसमाची सुरुवात दमदारपणे केली आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आणि अर्धशतक झळकावले. त्याच्या संघाला येथे पराभवाला सामोरे जावे लागले, पण धोनी आपल्या जुन्या रंगात दिसला.

Advertisement

चेन्नईची आज लखनौशी लढत होईल तेव्हा या काळात माजी कर्णधारासह विशेष कामगिरी करण्याची संधी असेल. धोनीने 15 धावा केल्या तर टी-20 क्रिकेटमध्ये 7000 धावा करणारा तो पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरेल. त्याच्या आधी फक्त विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि रॉबिन उथप्पा यांनी हा आकडा पार केला आहे. या सर्वांनी 7000 किंवा त्याहून अधिक टी-20 धावा केल्या आहेत.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

सर्वाधिक T20 धावा करणारे भारतीय:
विराट कोहली: 10326धावा
रोहित शर्मा: 9936 धावा
शिखर धवन: 8818 धावा
रॉबिन उथप्पा: 7070 धावा
एमएस धोनी: 6985 धावा

Advertisement

जगातील सर्वाधिक T20 धावा करणारा खेळाडू:
ख्रिस गेल: 14562 धावा
शोएब मलिक : 11698
किरॉन पोलार्ड: 11430
ऍरॉन फिंच: 10444
विराट कोहली: 10326 धावा

Advertisement
Advertisement

Leave a Reply