मुंबई – आयपीएलच्या 15 व्या मोसमातील सातवा सामना लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात होणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. लखनौ आणि चेन्नईच्या नजरा या स्पर्धेतील पहिल्या विजयावर आहेत. रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) संघाचा पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) पराभव झाला होता. त्याचवेळी केएल राहुलचा (K.L.Rahul) संघ गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) पराभूत झाला होता. आता हे दोन्ही संघ आपापल्या दुसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करतात का हे पाहायचे आहे.
चेन्नई सुपर किंग्जबद्दल बोलायचे झाले तर 14 कोटींचा वेगवान गोलंदाज दीपक चहरही या सामन्यात खेळू शकणार नाही. गेल्या सामन्यात न खेळलेल्या मोईन अलीचे पुनरागमन निश्चित आहे. मिचेल सँटनरच्या जागी त्याला संधी दिली जाऊ शकते. जडेजाला सँटनरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळायचे नसेल, तर पहिल्या सामन्यात खराब फलंदाजी करणाऱ्या डेव्हॉन कॉनवेला दोष देता त्याला कदाचित सोडावे लागेल.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
डावखुरा फिरकीपटू सँटनरच्या जागी मोईनचा संघात समावेश केल्यास संघाकडे एक डावखुरा आणि एक उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज असेल. मोईन उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. त्याचवेळी जडेजा डाव्या हाताने फिरकी करतो. चेन्नईचा संघ नेहमीच फारसा बदल करणारा फ्रँचायझी राहिला नाही. एक बदल वगळता उर्वरित संघ तसाच राहण्याची शक्यता आहे.
लखनौबद्दल बोलायचे झाले तर पहिला सामना संघासाठी फारसा चांगला नव्हता. आघाडीच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरत होते आणि वेगवान गोलंदाजांची निराशा झाली. लखनौचे दोन प्रमुख परदेशी खेळाडू मार्कस स्टॉइनिस आणि जेसन होल्डर अद्याप बाहेर आहेत. स्टॉइनिस सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळत आहे. त्याच वेळी, होल्डरने अद्याप बायो-बबलमध्ये प्रवेश केलेला नाही.
स्टॉइनिस आणि होल्डरशिवाय मार्क वूडच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या अँड्र्यू टायची उपलब्धता स्पष्ट नाही. जर टाय खेळण्यासाठी उपलब्ध असेल तर संघ त्याला प्लेइंग-11 मध्ये निश्चितपणे समाविष्ट करेल. क्विंटन डी कॉक, दुष्मंथा चमिरा आणि एविन लुईस हे तीन परदेशी खेळाडू गेल्या सामन्यात खेळले होते. टायच्या परतल्यावर मोहसीन खानला बाहेर बसावे लागू शकते.
चेन्नई सुपर किंग्जचे संभाव्य प्लेइंग-11
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, अॅडम मिल्ने आणि तुषार देशपांडे.
लखनौ सुपर जायंट्सचे संभाव्य प्लेइंग-11
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, मोहसिन खान/अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान, दुष्मंथा चमिरा.