Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. विल्यमसन मामाला बसला 12 लाखांचा फटका; जाणुन घ्या संपूर्ण प्रकरण

मुंबई –  सनरायझर्स हैदराबादने (SRH) आयपीएल 2022 (IPL 2022) चा पहिला सामना राजस्थानकडून (RR) 61 धावांनी गमावला. हा सामना SRH कर्णधार केन विल्यमसनसाठी (Ken Williamson) दुहेरी पराभव होता. प्रथम संघ हरला, नंतर त्यांना 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

Advertisement

आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, 29 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यान विल्यमसनला स्लो ओव्हर-रेट राखल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. ओव्हर स्पीडशी संबंधित ही त्याची पहिली चूक आहे, त्यामुळे 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स (MI) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला होता.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

स्लो ओव्हर रेट म्हणजे काय?
ओव्हर रेट म्हणजे एका तासात गोलंदाजाने टाकलेल्या षटकांची सरासरी संख्या. आयसीसीच्या नियमांनुसार, एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये एका तासात 14.1 षटके टाकावी लागतात आणि कसोटीत 14.2 षटके टाकावी लागतात. एकदिवसीय सामन्यांमध्ये, गोलंदाजीला 50 षटके टाकण्यासाठी एकूण 3.5 तास दिले जातात. त्याच वेळी, टी-20 सामन्यात संघाला एक डाव एक तास 25 मिनिटांत संपवावा लागतो, म्हणजेच 20 षटकांचा कोटा टाकावा लागतो.

Advertisement

पहिल्या सामन्यात हैदराबाद संघाचा पराभव झाला
केन विल्यमसनला दंड ठोठावण्यापूर्वी त्याच्या संघाला आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यातही पराभवाला सामोरे जावे लागले होते. मंगळवारी हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र राजस्थानच्या फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी करत 20 षटकांत 210 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ अवघ्या 149 धावांत ऑलआऊट झाला. आयपीएलच्या गेल्या मोसमात शेवटचे स्थान मिळवणाऱ्या हैदराबादने यंदाच्या मोसमातही पराभवाची सुरुवात केली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply