Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

PAK Vs AUS: ट्रॅव्हिस हेडने रचला इतिहास; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

मुंबई – पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. कर्णधार अॅरॉन फिंच (Aaron Finch ) आणि ट्रॅव्हिस हेड ( Travis Head) यांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची शतकी भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. दरम्यान, हेडने कारकिर्दीतील दुसरे शतक ठोकले.

Advertisement

2018 नंतर पहिला वनडे खेळणाऱ्या हेडने अवघ्या 70 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे पाकिस्तानविरुद्धचे हे सर्वात जलद वनडे शतक आहे. हेडच्या कारकिर्दीतील हे केवळ दुसरे शतक आहे. त्याने आपली दोन्ही शतके पाकिस्तानविरुद्धच झळकावली आहेत.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

हेडने 72 चेंडूंत 12 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 101 धावांची शतकी खेळी केली. त्याला इफ्तिखार अहमदने खुशदिल शाहच्या हाती झेलबाद केले. हेडने याआधी 2017 मध्ये अॅडलेडच्या ओव्हलमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिले शतक झळकावले होते तेव्हा त्याने 128 धावांचे शतक झळकावले होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply