Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

विराट कोहली इतिहास रचणार; IPL मध्ये अशी कामगिरी करणारा ठरणार दुसरा फलंदाज

मुंबई – इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या सामन्यात 205 धावा करूनही बंगळुरूला पंजाब किंग्जकडून पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. RCB आता IPL च्या 15 व्या मोसमातील त्यांच्या दुसर्‍या सामन्यात बुधवारी नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर दोन वेळच्या चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR) सामना करेल.

Advertisement

फाफ डू प्लेसिसच्या (Faf du plessis) नेतृत्वाखालील आरसीबी संघाला या सामन्यात विजयाची नोंद करण्याची संधी आहे. गेल्या सामन्यात बंगळुरूसाठी फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. कर्णधार डू प्लेसिसने 88 आणि माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नाबाद 41 धावा केल्या. कोहलीला आता कोलकाताविरुद्धही आपला हाच फॉर्म कायम ठेवायला आवडेल.

Advertisement

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात 33 वर्षीय कोहली मोठी कामगिरी करू शकतो. विराटने आतापर्यंत आयपीएलमधील 208 सामन्यांच्या 200 डावांमध्ये 547 चौकार मारले आहेत. या सामन्यात विराटने आणखी तीन चौकार लगावले तर तो आयपीएलच्या इतिहासात 550 चौकार लगावणारा दुसरा फलंदाज ठरेल.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शिखर धवन अव्वल स्थानावर आहे. 36 वर्षीय शिखरच्या नावावर आतापर्यंत IPL मध्ये 659 चौकार आहेत. सनरायझर्स हैदराबादचा माजी सलामीवीर आणि सध्याचा दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये वॉर्नरच्या नावावर 525 चौकार आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply