मुंबई – पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट बोर्ड पुन्हा एकदा वेस्ट इंडिजचे (West Indies) यजमानपदासाठी सज्ज झाले आहे. कॅरेबियन संघ जूनमध्ये एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे. यासाठीचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. गेल्या वर्षी, कोरोना महामारीमुळे, जैव-बबलमध्ये संसर्ग झाल्यानंतर दोन्ही देशांमधील मर्यादित षटकांची मालिका पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा दौरा आयोजित केला जात आहे.
तारखांची घोषणा करताना, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, ही एकदिवसीय मालिका 2023 मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर सुपर लीग सामन्यांतर्गत येते. त्यामुळेच जून महिन्यात या मालिकेचे आयोजन करण्यात येत आहे.
पाकिस्तान-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सोमवारी सांगितले की ते विश्वचषक सुपर लीग सामन्यांसाठी वेस्ट इंडिजचे यजमानपद भूषवतील आणि हे सामने 8, 10 आणि 12 जून रोजी रावळपिंडी येथे खेळवले जातील.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
वेस्ट इंडिजने गेल्या वर्षाच्या अखेरीस पाकिस्तानचा दौरा केला होता, परंतु त्यांच्या संघात कोविड-19 संसर्गाची अनेक प्रकरणे समोर आल्याने त्यावेळी एकदिवसीय मालिका पुढे ढकलण्यात आली होती. पाहुणा संघ केवळ तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळून तेथून परतला होता.