मुंबई – दिल्ली कॅपिटल्सने (Delhi capitals) आयपीएल 2022 ची (IPL 2022) सुरुवात विजयाने केली. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंतच्या (Rishabh pant) नेतृत्वाखालील दिल्लीने पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) चार विकेट्स राखून पराभव केला. दिल्लीला आता गुजरात टायटन्ससोबत (Gujarat Titans) 2 एप्रिलला पुढील सामना खेळायचा आहे. मात्र त्याआधीच त्याला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शला (Mitchell Marsh) दुखापत झाल्याने त्याचे आयपीएलमधील खेळीबाबत शंका निर्माण झाली आहे.
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्श सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर असून यजमान देशासोबतच्या वनडे मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. मात्र मालिका सुरू होण्यापूर्वीच तो जखमी झाला. त्याला हिपला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो तीन सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे.
या लिलावात दिल्ली संघाने मार्शला तब्बल 6.5 कोटी रुपयांना सामील करून घेतले. पाकिस्तान मालिकेनंतर तो 6 एप्रिलला फ्रँचायझीमध्ये सामील होणार होता.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
मार्शच्या दुखापतीबद्दल तपशील देताना ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरॉन फिंचने सांगितले की, सराव सत्रादरम्यान त्याला हिपचा त्रास झाला आणि त्यानंतर त्याला स्कॅनिंगसाठी पाठवण्यात आले. आम्ही अहवालाची वाट पाहू आणि त्यानंतरच काय झाले ते कळेल, परंतु मला वाटते की तो आगामी मालिकेत खेळू शकणार नाही.
30 वर्षीय मार्श सध्या अव्वल अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या T20 विश्वचषक विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि न्यूझीलंडविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात त्याने सामना जिंकून 77 धावा केल्या होत्या.