दिल्ली – महिला विश्वचषक (Woman’s WC2022) च्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने (South Africa) भारताचा पराभव केला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर 3 विकेट्सने मात केली. या पराभवासह भारताचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न संपुष्टात आले. दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वोल्वार्डोने 80 धावा केल्या, तर लारा गुडॉलने 49 धावा करत संघासाठी उपयुक्त खेळी खेळली, याशिवाय मिग्नॉन डू प्रीझ आणि मारिझान कॅप (32) यांनी आपल्या संघाला निर्णायक वेळेत सर्वोत्तम खेळी दाखवत विजय मिळवून दिला.
नो बॉल मुळे गेम फिरला
शेवटच्या 6 चेंडूत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 7 धावांची गरज होती. मात्र त्रिशा चेट्टी अखेरच्या षटकात धावबाद झाल्याने सामना आणखीनच रोमांचक झाला. यानंतर दीप्ती शर्माने मिग्नॉन डू प्रीझला (50) बाद करत सामन्याचा रोमांचक कळस गाठला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 2 चेंडूत 2 धावांची गरज होती. अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दोन्ही चेंडूत दोन धावा करून विजय मिळवला.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 7 बाद 274 धावा केल्या. भारतासाठी स्मृती मानधना हिने 71 धावांची खेळी खेळली, त्याचा लावा शेफाली वर्माने 53 धावा करून शानदार सुरुवात केली. भारताची कर्णधार मिताली राजनेही अर्धशतक (68) झळकावत अप्रतिम कामगिरी केली. याशिवाय हरमनप्रीत कौरने 48 धावा करत भारताची धावसंख्या 250 च्या पुढे नेण्यात यश मिळवले.
खरेदिवाला सर्वांसाठी..! ऑफर आणि लव्ह एनकॅशसाठी आजच Kharediwala वर जाऊन आपल्या प्रियजनांना भेटवस्तू पाठवा
भारताच्या डावात 3 भारतीय फलंदाजांनी अर्धशतके झळकावली, ज्यामुळे संघ 274 धावा करू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून मसाबता क्लास आणि शबनीम इस्माईलने 2-2 विकेट घेण्यात यश मिळवले.