दिल्ली – जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक असलेला अर्जेंटिनाचा (Argentina) लिओनेल मेस्सी (Lionel Messi) या वर्षी कतारमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा म्हणू शकतो. शुक्रवारी (25 जानेवारी) रात्री त्याने घरच्या मैदानावर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. प्रसिद्ध बॉम्बेनेरा स्टेडियमवर त्याने शानदार गोल करून प्रेक्षकांना भावूक केले. गोल झाल्यानंतर अनेक प्रेक्षक रडताना दिसले. सामन्यानंतर मेस्सीने प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले.
खरेदिवाला सर्वांसाठी..! ऑफर आणि लव्ह एनकॅशसाठी आजच Kharediwala वर जाऊन आपल्या प्रियजनांना भेटवस्तू पाठवा
दक्षिण अमेरिका विश्वचषक पात्रता फेरीत अर्जेंटिनाने व्हेनेझुएलाचा 3-0 असा पराभव केला. निकोलस गोन्झालेझने 35 व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी पहिला गोल केला. त्यानंतर एंजल डी मारियाने 79व्या मिनिटाला आणि लिओनेल मेस्सीने 82व्या मिनिटाला गोल केला. पॅरिस सेंट-जर्मेनकडून क्लब फुटबॉल खेळणाऱ्या मेस्सीचे वर्ष फार चांगले गेले नाही. पॅरिस सेंट जर्मेनच्या संघात तो खेळाचा आनंद लुटत नसल्याचे दिसते. अर्जेंटिनात सामील होताच मेस्सी त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला.
159व्या सामन्यात मेस्सीने अर्जेंटिनासाठी 81वा गोल केले आहे.कतारमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी अर्जेंटिनाचा संघ आधीच पात्र ठरला आहे. 10 संघांचा दक्षिण अमेरिकन झोन 16 सामन्यांत 38 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. ब्राझील 42 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर व्हेनेझुएला 10 गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.
या सामन्यानंतर मेस्सी म्हणाला, “विश्वचषकानंतर मी काय करेन हे मला माहीत नाही. मी फक्त काय येणार आहे याचा विचार करत आहे. कतारनंतर मला अनेक गोष्टींचा नव्याने विचार करावा लागेल.” मेस्सीच्या या वक्तव्यानंतर तो कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याचे समजते. मेस्सीने गेल्या वर्षी संघासह पहिले विजेतेपद पटकावले होते. अर्जेंटिनाने ब्राझीलला हरवून कोपा अमेरिका जिंकली होती.